उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. तुळजा साळुंखे ही या पिढीतील एक आहे !
‘वैशाख शुक्ल अष्टमी (२४.४.२०२६) या दिवशी चि. तुळजा अनिल साळुंखे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. तुळजा अनिल साळुंखे हिला द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी
अ. ‘मी गर्भारपणात नियमित प्रार्थना करत होते आणि कृतज्ञता व्यक्त करत होते. मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप बसून करत होते. मी कार्यालयात जातांना प्रवासात कुलदेवीचा नामजप करत असे.
आ. मला ९ व्या मासात गुरुदेवांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ सत्संगाशी संबंधित सेवा मिळाली होती. ‘या सेवेचा तुळजावर सकारात्मक परिणाम झाला आहे’, असे मला वाटते.
इ. मी कार्यालयात एका जागी बसून काम करूनही ९ मास मला गुरुकृपेने कोणताही शारीरिक त्रास झाला नाही.
२. जन्म ते ६ मास
२ अ. देवाची आवड
१. चि. तुळजा जन्मतःच शांत आणि हसतमुख आहे. आम्ही श्रीकृष्णाचा नामजप करत आणि भक्तीगीत म्हणत तिला जेवण भरवले की, ती शांतपणे जेवत होती.
२. आम्ही भ्रमणभाषवर श्रीकृष्ण आणि दत्त यांचा नामजप लावल्यावर ती शांत होते. तेव्हा तिच्या चेहर्यावर पुष्कळ आनंद दिसतो.
२ आ. ती ६ मासांची असल्यापासून तिला श्रीकृष्णाचे चित्र आणि गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) छायाचित्र पाहून पुष्कळ आनंद होतो.
३. ७ मास ते १ वर्ष
३ अ. सात्त्विकतेची आवड
१. ‘तुळजाला समोरच्या व्यक्तीमधील स्पंदने जाणवतात’, असे मला वाटते. ती आमचे चांगल्या स्वभावाचे नातेवाईक आणि समाजातील व्यक्ती यांना सकारात्मक प्रतिसाद देते.
२. एकदा पुणे येथे पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत, वय ४४ वर्षे) यांचा सत्संग होता. आम्ही तुळजाला घेऊन त्या सत्संगाला गेलो होतो. तेथे ती अन्य बालसाधकांशी पूर्वीची ओळख असल्याप्रमाणे खेळत होती.
शांत आणि सात्त्विक वृत्तीची चि. तुळजा साळुंखे (वय २ वर्षे) !

१. ‘चि. तुळजा सात्त्विक आणि शांत आहे. तिचे आई-वडील तिला दुसर्या ठिकाणी घेऊन गेल्यावरही ती तेथे सहजतेने वागते. तिची आई तिला सत्संग, शिबिर असतांना घेऊन येते. तेव्हा तुळजा शांत असते.
२. ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे एकटक पहाते. ‘ती सूक्ष्मातून श्रीकृष्णाशी बोलते’, असे मला जाणवते.
३. चि. तुळजाच्या आईने ‘गर्भारपणात केलेला नामजप, तुळजाच्या जन्मानंतर तिच्यावर केलेले साधनेचे संस्कार आणि ‘ती साधकांच्या सहवासात रहावी’, यासाठी केलेले प्रयत्न’ यांचा तुळजावर सात्त्विक परिणाम झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले.’
– पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत, वय ४४ वर्षे), पुणे (२६.३.२०२६)

४. वय १ ते २ वर्षे
४ अ. व्यवस्थितपणा : ती सर्व वस्तू जागच्या जागी ठेवते.
४ आ. निरीक्षणक्षमता : ती आम्ही करत असलेली कृती लक्षात ठेवून त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करते.
४ इ. ऐकण्याची वृत्ती : तिला ‘एखादी कृती कर अथवा करू नको’, तसेच ‘एखाद्या वस्तूला हात लावू नको’, असे सांगितले, तर ती लगेच ऐकते.’
– सौ. कीर्ती अनिल साळुंखे (चि. तुळजाची आई), सिंहगड रस्ता, पुणे.
४ ई. समंजस : ‘आम्ही दोघेही नोकरी करतो. आम्ही कार्यालयात असतांना तुळजा एक वर्षाची असल्यापासून शेजारी काकूंकडे रहाते. तेथे ती कोणताही त्रास न देता आनंदाने रहाते.
४ उ. सहनशील : ती रुग्णाईत असतांना आम्हाला त्रास देत नाही.

४ ऊ. श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्याप्रती भाव : ती श्रीकृष्णाच्या चित्रासमोर आणि गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) छायाचित्रासमोर डोके टेकवून नमस्कार करते. तिला हातात उदबत्ती घेऊन पूजा करायची असते.
४ ए. वास्तूशुद्धी करणे : आम्ही तिला कडेवर घेऊन नामजप करत वास्तूशुद्धी करतो. तीही सनातन गोमूत्र अर्काची बाटली हातात घेऊन नामजप करत वास्तूशुद्धी करते.
४ ऐ. ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या शेवटी आम्ही श्लोक म्हणत असतांना ती लक्ष देऊन ऐकते. तेव्हा तिच्या चेहर्यावर स्मितहास्य असते.’
– श्री. अनिल साळुंखे (चि. तुळजाचे वडील), सिंहगड रस्ता, पुणे.
‘भगवान श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या कृपेनेच आम्ही या बालकाचे संगोपन करू शकत आहोत’, त्याबद्दल आम्ही गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ – सौ. कीर्ती आणि श्री. अनिल साळुंखे (१९.२.२०२६)
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे