३.४.२०२६ या दिवशी फोंडा, गोवा येथील साधक श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांचे धाकटे भाऊ श्री. सदानंद जोशी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. कुटुंबातील सदस्यांची काळजी घेऊन त्यांचे दायित्व स्वीकारणे
‘आमचे वडील बंधू श्री. आत्माराम जोशी यांना आम्ही सर्व जण ‘आप्पा’ या नावाने संबोधतो. ‘वडील बंधू’ या नात्याने त्यांनी आमच्या कुटुंबातील सदस्यांची पुष्कळ काळजी घेतली आहे. विशेष करून त्यांनी आम्हा लहान भावांना आणि बहिणीला शिक्षणासाठी पुष्कळ प्रोत्साहन दिले अन् त्याचे उत्तरदायित्वही घेतले.
२. इतरांना विचारून कृती करणे
कोणतीही विशेष कृती किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या आधी ती. आप्पा इतरांना त्याविषयी विचारून घेतात. मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही त्यांनी कित्येक वेळा कितीतरी गोष्टींविषयी मला विचारले आहे आणि अजूनही ते मला विचारतात.

३. तळमळ
कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला जाईपर्यंत ती. आप्पा त्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करतात.
४. वडील बंधूंमध्ये जाणवलेले पालट
४ अ. प्रतिक्रिया न्यून होणे : ‘ती. आप्पांमध्ये प्रतिक्रिया येण्याचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले आहे’, असे मला जाणवते. त्यांना कधी एखाद दुसरी प्रतिक्रिया आली, तरी ती टिकण्याचा कालावधी अल्प असतो.
४ आ. अंतर्मुखता वाढणे : ‘त्यांची बहिर्मुखता न्यून होऊन अंतर्मुखता वाढली आहे’, असे लक्षात येते. अधिकाधिक नामजप करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे.
४ इ. वृत्ती समाधानी होणे : संसारातील सर्व गोष्टी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेने सुरळीत आणि समाधानकारक घडल्याने आता त्यांना ‘कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही’, असे मला जाणवले. त्यांचे मन आता तृप्त आहे.
गेली काही वर्षे ‘ती. आप्पांमध्ये पालट व्हावा’, यासाठी माझ्या वहिनी सौ. शकुंतला आत्माराम जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७५ वर्षे) यांनी त्यांना पुष्कळ प्रोत्साहन दिले आणि सातत्याने त्यांचा पाठपुरावा केला आहे.’
– श्री. सदानंद वा. जोशी (श्री. आत्माराम जोशी यांचे लहान भाऊ, वय ६५ वर्षे), फोंडा, गोवा. (३.४.२०२६)
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !