
इंफाळ (मणीपूर) – येथील उखरुल जिल्ह्यात १८ एप्रिल या दिवशी दुपारी अडीच वाजता एका निवृत्त सैन्य अधिकार्यासह एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एस्.डब्ल्यू. चिनाओशांग आणि यरुइंगम वाशुम अशी त्यांची नावे असून दोघे इंफाळहून उखरुलला जात असतांना फुटीरतावाद्यांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला.
‘कुकी जो कौन्सिल’ने या घटनेत कुकी समुदायाच्या कोणताही हात नसल्याचे सांगितले आहे, तर ‘तंगखुल नागा लाँग’च्या कार्यकारी समितीने घटनेचा निषेध करत ‘हे आक्रमण कुकी समुदायाने केले आहे’, असा आरोप केला आहे.
या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आले आहे. सुरक्षादले आक्रमणकर्त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी उखरुलला भेट दिली होती आणि कुकी आणि नागा समुदाय यांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’