विश्व हिंदू परिषदेची मागणी

नवी मुंबई, १८ एप्रिल (वार्ता.) – नाशिकमधील धर्मांतराचे प्रकरण पहाता ‘देशातील सर्व आंतरराष्ट्रीय आस्थापनांचे योग्य प्रकारे लेखापरीक्षण (ऑडिट) झाले पाहिजे’, अशी आमची शासनाकडे मागणी आहे. त्या ठिकाणी काही देशद्रोही शक्ती कार्यरत असल्यास त्यांचे अन्वेषण करून त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. आतापर्यंत लव्ह जिहाद, भूमी जिहाद असे प्रकार चालू होते; परंतु आता ‘कॉर्पोरेट (व्यावसायिक) जिहाद’ करणार्या शक्ती देशभरामध्ये कार्यरत आहेत. वर्ष १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर देशाला स्वातंत्र्य मिळाले. तरीसुद्धा भारताविषयी अशी मानसिकता असलेली जिहादी प्रवृत्ती सध्या भारतात बोकाळली आहे. प्रशासनाच्या नाकाखाली या घटना घडत असतांना त्यांनी याची वेळीच नोंद घेतली नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आतातरी जागे व्हा ! अन्यथा ही आग तुमच्या घरापर्यंत पोचल्याविना रहाणार नाही, असे विधान मागणी विश्व हिंदु परिषदेचे प्रांतमंत्री मोहन साळेकर यांनी येथे केले. नाशिकमधील धर्मांतराच्या प्रकरणाच्या अनुषंगाने कोकण भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. त्यात ते बोलत होते.
या वेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री स्वरूप पाटील, शंकर संगपाळ, अजय मुडपे, शीतल निकम, सुरेश राणा यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना शीतल निकम म्हणाल्या, ‘‘देशातील अनेक शहरांतून लव्ह जिहाद, लष्कर आणि रेल्वे यांच्या भूमीवरील अतिक्रमणे, अन्नपदार्थांचे अपवित्रीकरण, मुसलमानबहुल भागांमध्ये हिंदु कुटुंबांवरील अत्याचार, तसेच अनुसूचित जाती-जमातीतील मुलींचे शोषण अशा घटना समोर येतात. याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. ‘दुर्गा वाहिनी’द्वारे लव्ह जिहाद विषयी जनजागृती केली आहे.’’
सुरेश राणा म्हणाले, ‘‘यापुढे निषेध आंदोलन नाही, तर त्यांना जी भाषा कळते, त्या भाषेतच उत्तर द्यावे लागेल. हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार असतांना जिहादींची अशा प्रकारे कृत्य करण्याचा हिंमत कशी होते ? नवी मुंबईत अशी घटना झाल्यास जिहादींना घरात घुसून उत्तर देऊ.’’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !