‘सौ. संगीता रमेश आहुजा या हाँगकाँग येथे रहात असून त्यांनी मुंबईतील ‘द योग इन्स्टिट्यूट’मधून प्रशिक्षण घेतले आहे. सध्या त्या हाँगकाँग येथे स्वतःचे ‘योगकेंद्र’ चालवतात. आध्यात्मिक प्रवचनांसाठी त्या त्यांचे योगकेंद्र नेहमी उपलब्ध करून देतात. सौ. संगीता आहुजा आणि त्यांचा मुलगा श्री. विशाल हे वर्ष २०१७ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्य शाळेला उपस्थित होते. त्या वेळी त्या दोघांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात सौ. संगीता आहुजा यांना आलेल्या अनुभूती
१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी रूप पहाताच आनंदाची स्थिती अनुभवणे : सत्संगात सौ. संगीता यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पहिल्यांदाच पाहिले. सत्संगाविषयी त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेव पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी दिसत होते. ‘त्यांनी मला आशीर्वाद दिला’, असे जाणवून मी आनंदाची स्थिती अनुभवली. मी त्यांच्या चरणी प्रार्थना केली, ‘‘गुरुदेव, तुम्ही करत असलेल्या मार्गदर्शनानुसार मला साधना करता येऊ दे !’’ यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘साधनेत प्रगती करण्याची तुम्हाला चांगली संधी आहे.’’
१ आ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांच्या करुणामय दृष्टीतून मुलाला ऊर्जा आणि आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझा मुलगा विशाल याच्याकडे पाहून स्मित केले. तेव्हा मला जाणवले की, गुरुदेव त्यांच्या करुणामय दृष्टीतून विशालला ऊर्जा आणि आशीर्वाद देत आहेत.

२. मुलाच्या, विशाल यांच्या अपघाती निधनानंतर भ्रमणभाषवर बोलतांना साधिकेने अनुभवलेला सौ. संगीता आहुजा यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला कृतज्ञताभाव
सौ. संगीता यांच्या मुलाचा, विशाल आहुजा याचा ऑगस्ट २०२५ मध्ये वयाच्या ३९ व्या वर्षी अपघाताने मृत्यू झाला. याविषयी मला हाँगकाँग येथील माझ्या एका मैत्रिणीकडून कळले. मी त्वरित संगीता यांच्या भ्रमणभाषवर एक सांत्वनपर संदेश पाठवला. त्या विदेशात रहात असल्या, तरी मी त्यांना नियमित सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सुवचने, महत्त्वाचे लेख आणि ‘लिंक्स्’ पाठवत असते. नुकतीच मी त्यांना मे २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कार्यक्रमाची ‘लिंक’ही पाठवली होती.
२ अ. सौ. संगीता यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला कृतज्ञताभाव पाहून साधिकेचे मन भारावून जाणे : मी सौ. संगीता यांना संदेश पाठवून त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी स्वतःहून मला भ्रमणभाष केला आणि ‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायची आहे’, असे सांगितले. एवढ्या कठीण परिस्थितीतही त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला कृतज्ञताभाव पाहून मी भारावून गेले.
२ आ. आध्यात्मिक त्रासामुळे त्रस्त असलेल्या श्री. विशाल यांनी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ ऑनलाईन पहाणे आणि त्यानंतर ते आनंदी अन् स्थिर होणे : सौ. संगीता मला म्हणाल्या, ‘‘मी माझ्या मुलाला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कार्यक्रमाची ‘लिंक’ पाठवली होती. तेव्हा माझ्यापेक्षा त्यानेच तो कार्यक्रम अधिक वेळ पाहिला. त्याला हा कार्यक्रम पहाता आला, याबद्दल मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. महोत्सव पहातांना, तसेच त्या वेळचे मार्गदर्शन ऐकतांना आणि नंतर महोत्सवामुळे त्याला झालेल्या लाभामुळे तो पुष्कळ आनंदी होता. त्याने मला दोन वेळा धन्यवाद दिले. पूर्वी तो आध्यात्मिक त्रासामुळे त्रस्त असायचा; परंतु महोत्सव पाहिल्यापासून तो आनंदी आणि अधिक स्थिर झाला होता. महोत्सवाच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी त्याच्यावर कृपा केली आणि त्यामुळे तो आनंदी होता. त्याच्या पुढील प्रवासातही ‘गुरुदेव त्याच्यावर कृपा करणार आहेत’, याची मला निश्चिती आहे.’’
२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा हस्तस्पर्श झालेली एक वस्तू हातात घेतल्यानंतर साधिकेच्या मनाची नकारात्मक स्थिती पूर्णतः सकारात्मक होणे : सौ. संगीता पुढे म्हणाल्या, ‘‘समाजातील काही लोकांच्या अयोग्य वर्तनामुळे मागील वर्षी माझी मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्या वेळी एक संत एकदा हाँगकाँगला आल्या होत्या. त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा हस्तस्पर्श झालेली एक वस्तू माझ्या हातात दिली. ‘त्या वस्तूतील चैतन्य मिळावे’, यासाठी मी ती वस्तू काही वेळ हातात धरली. नंतर काही दिवसांतच माझ्या मनाची नकारात्मक स्थिती जाऊन ती सकारात्मक झाली. माझ्यासाठी हा चमत्कारच होता. शिष्य स्वतःहून काही करण्यास असमर्थ असतो आणि अशा वेळी ‘स्वतः गुरुदेव त्या शिष्याच्या घरी येऊन साहाय्य करतात’, हे पाहून मी भारावून गेले.
२ ई. साधना करता येण्यासाठी साधिकेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना केलेली भावपूर्ण प्रार्थना ! : तुम्ही गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) माझा साष्टांग नमस्कार सांगा आणि माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांना आशीर्वाद देण्यास सांगा. माझी गुरुदेवांवर नितांत श्रद्धा आहे. साधनेत पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी मला त्यांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. मला व्यावहारिक कर्तव्यांतून मुक्त होऊन केवळ अंतर्यामी वसलेल्या ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे. हे साध्य होण्यासाठी केवळ गुरुदेवच मला साहाय्य करू शकतात.’’
सौ. संगीता यांच्याकडून शिकण्याची संधी दिल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– अनु परसराम, फोंडा, गोवा. (डिसेंबर २०२५)
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !