
हिंदूंवर होणारे अन्याय ‘सनातन प्रभात’ निर्भीडपणे मांडते ! – राजेंद्र भोबे, रा.स्व. संघाचे गोवा संघचालक

१. मी गेल्या २५ वर्षांपासून ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. मला २००९ मधील एक घटना प्रकर्षाने आठवते. त्या वेळच्या निवडणुकांनंतर जेव्हा हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे सरकार आले नाही, तेव्हा अनेकांना नैराश्य आले होते; पण ऑक्टोबर २००९ मध्ये ‘सनातन प्रभात’मध्ये एक भाकीत आले की, वर्ष २०१२ नंतर देशात प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेतृत्व पुढे येईल’ आणि अगदी तसेच घडले. वर्ष २०१४ मध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला नेतृत्व लाभले.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील डॉ. आठवले यांचे अध्यात्म आणि विज्ञान यांवरील विचार पुष्कळ मार्गदर्शक असतात. कॅनडा किंवा इतर देशांमध्ये हिंदूंवर आणि मंदिरांवर होणारे अन्याय जे इतर वृत्तपत्रे छापत नाहीत, ते ‘सनातन प्रभात’ निर्भीडपणे मांडते.
३. समाजात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि वाढती व्यसनाधीनता पाहिली की वाटते, आपण व्यावहारिक प्रगती केली; पण वैचारिक प्रगती झाली का ?
४. मंदिरे ही केवळ उत्सवासाठी नसून संस्कारांची केंद्रे झाली पाहिजेत.
हिंदूंना शत्रूबोध करून देणारे दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ ! – सत्यविजय नाईक, गोवा राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

१. वृत्तपत्र क्षेत्रात हे एकमेव असे वृत्तपत्र आहे, जे व्यक्तीला आनंदमय जीवन जगण्याचे माध्यम ठरते.
२. कोणत्याही भक्कम आर्थिक पाठबळाविना आणि हिंदुविरोधकांचा विरोध पत्करून तब्बल २ तपांहून अधिक काळ हिंदुत्वनिष्ठ वृत्तपत्र चालवणे, ही सोपी गोष्ट नाही. हे वृत्तपत्र चालू झाले, तेव्हा ‘सनातन’ शब्द उच्चारणे किंवा हिंदुत्वावर बोलणे, हा गुन्हा मानला जात होता. अशा काळात प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समाजात प्रखर विचार मांडण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले.
३. शत्रूशी लढण्यासाठी त्याची क्षमता आणि चाल ओळखणे आवश्यक असते. गेल्या २७ वर्षांपासून हिंदूंना त्यांचा खरा शत्रू कोण आहे ? याची जाणीव करून देण्याचे काम ‘सनातन प्रभात’ने केले आहे.
४. ‘हातकातरो खांब’ आंदोलनाचा इतिहास आणि हिंदूंनी सोसलेल्या नरकयातना सातत्याने छापल्यामुळेच आज गोवा सरकारने या खांबाला ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे.
५. हे वृत्तपत्र वाचकांना राष्ट्र आणि धर्मा यांसाठी कृतीशील बनवते.
‘सनातन प्रभात’ हिंदू संघटनाची भूमिका बजावते ! – नीलेश कुलकर्णी, उपसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’

१. गेल्या २७ वर्षांपासून अव्याहतपणे, एकही सुटी न घेता, पूर्ण विरोध पत्करून, आर्थिक हानी सोसून ‘सनातन प्रभात’ गुरुदेवांवरील श्रद्धेच्या बळावर चालू आहे आणि त्याचा विस्तारही झाला आहे.
२. आसाम, बंगाल, मणीपूर यांच्यासह बांगलादेश, पाकिस्तान येथे जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतात, आघात होतात, तेव्हा तेव्हा ‘सनातन प्रभात’ आवाज उठवते. गोव्यातल्या हिंदूंना जेव्हा आसाममधल्या हिंदूंच्या वेदनेची जाणीव होईल, काश्मीरमधल्या हिंदूंच्या वेदनेची जाणीव जेव्हा कन्याकुमारीच्या हिंदूंना होईल, तेव्हा खर्या अर्थाने हिंदूसंघटन होईल. या अर्थाने ‘सनातन प्रभात’ हिंदूसंघटनाचीही भूमिका बजावत आहे.
३. मर्दनगड हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यात बांधलेला एकमेव किल्ला आहे. या किल्ल्याचे जतन, संवर्धन आणि संरक्षण मोहिमेला ‘सनातन प्रभात’ने विशेष प्रसिद्धी दिली. त्यानंतर गोवा सरकारने मर्दनगड वारसा स्थळ म्हणून अधिसूचित केला.
४. शेवटी मी सर्वांना आवाहन करतो की, आपले जे काही दैनंदिन समाजहितकारी अनुभव आहेत, ते दैनिकाला अवश्य पाठवा.
| हे ही वाचा → दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘गोवा आणि सिंधुदुर्ग’ आवृत्तीचा २७ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा |
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati