
पणजी/सावंतवाडी, १२ एप्रिल (वार्ता.) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गेली २७ वर्षे अखंड कार्यरत असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २७ वा वर्धापनदिन सोहळा पर्वरी (पणजी) येथील संत गाडगेबाबा सभागृहात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सोहळा ऐतिहासिक राजवड्याच्या सभागृहात भावपूर्णरित्या अन् उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पर्वरी येथील सोहळ्याला ४०० जणांची, तर सावंतवाडी येथे ४५० जणांची उपस्थिती होती.
या सोहळ्याचा प्रारंभ शंखनाद करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन या वेळी करण्यात आले, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’वर आधारित ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) दाखवण्यात आली. तपोभूमी येथील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश पद्मश्री विभूषित अध्यात्म शिरोमणी सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांनी वर्धापनदिनानिमित्त दिलेला आशीर्वादपर संदेश पर्वरी येथील सोहळ्यात वाचून दाखवण्यात आला.
गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा 27 वा वर्धापनदिन । Goa , 12 एप्रिल 2026 |
उपस्थित मान्यवर
श्री. प्रवीण झांट्ये, माजी आमदार, मये मतदारसंघ
श्री. गोविंद गोवेकर, पंचसदस्य, नास्नोडा ग्रामपंचायत
अधिवक्ता संतोष रिवणकर, उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता
श्री. राघव शेट्टी, व्यावसायिक
श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, गोमंतक मंदिर महासंघ
श्री. किशोर कोलवाळकर, निवृत्त मुख्य कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते
अधिवक्ता प्रमोद हेदे, मडगाव
श्री. शिवप्रसाद जोशी, पुजारी, श्री मूळवीर संस्थान, मालपे, पेडणे
वितरकांचा सत्कार
या वेळी ‘सनातन प्रभात’चे दीर्घकाळ वितरण करणारे पणजी येथील श्री. देवीदास गावकर, मुरगाव येथील श्री. विवेक रेडकर, म्हापसा येथील श्री. भगवान तळकटकर आणि म्हापसा येथील श्री. राजेंद्र गावस यांचा सत्कार श्री. राजेंद्र भोबे यांच्या हस्ते करण्यात आला.
वाचकांपैकी श्री. भानुदास चौधरी, सौ. रेश्मा तळावलीकर आणि श्री. रमेश नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. पर्वरी येथील कार्यक्रमात सूत्रसंचालन सौ. गौरी नायक यांनी केले.

सावंतवाडी येथील सोहळ्यात वेदपाठशाळेच्या वेदमूर्तींनी वेदपठण केले. सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान धर्मप्रेमी श्री. जनार्दन भागवत यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मधुरा सावंत यांनी केले.
सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
नगरसेविका सौ. दीपाली भालेकर, निवृत्त प्राध्यापक श्री. सुभाष गोवेकर, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अधिवक्ता अनिल निरावडेकर; मणेरी येथील श्री दत्तमंदिराचे विश्वस्त, माजी पोलीस अधिकारी श्री. सखाराम सावंत, बांदा येथील उद्योजक श्री. नितीन मावळणकर, भारतीय सेनेचे सैनिक श्री. अजय राणे; शेर्ले, बांदा येथील श्री. राजन जोशी यांची उपस्थिती लाभली होती.
| हे ही वाचा → दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील मान्यवरांचे उद्बोधक मार्गदर्शन ! |
क्षणचित्रे
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी २७ वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’ची मुहूर्तमेढ रोवली. गेली २७ वर्षे अव्याहतपणे एकही दिवस सुटी न घेता साधकांच्या त्यागातून दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू आहे. अशा दैनिकाची वितरणाची सेवा गेली अनेक वर्षे करणारे सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यांतील वितरक सर्वश्री सीताराम म्हापणकर, शांताराम परब, बबन तावडे, प्रकाश चव्हाण, बाबू ठुमरे, अशोक मांजरेकर यांचा सत्कार सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन या वेळी करण्यात आले. या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’वर आधारित ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) दाखवण्यात आली.
‘सनातन प्रभात’ला पुढील काळात अधिक यश लाभो !दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त तपोभूमी येथील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश पद्मश्री विभूषित अध्यात्म शिरोमणी सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांचा आशीर्वाद !![]() हिंदु धर्म केवळ धर्म नसून ती एक अखंड जीवनपद्धत आहे, जी सत्य, धर्म, करुणा, संयम आणि कर्तव्य यांसारख्या उच्च मूल्यांवर आधारलेली आहे. या सनातन परंपरेने मानवजातीला अध्यात्म, विज्ञान, संस्कार आणि संस्कृती यांचा अद्वितीय संगम दिला आहे. धर्मजागृती, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कृतीसंवर्धन हे प्रत्येक सज्जनाचे कर्तव्य असून या माध्यमातूनच समाजात सदाचार, नैतिकता आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होते. राष्ट्रसेवा आणि संस्कृती संवर्धन यांसाठी कटीबद्ध असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र आज २७ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आहे. या प्रदीर्घ कार्यकाळात गोवा, तसेच देशातील विविध प्रांतांतील सामाजिक, राष्ट्रीय, धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोडी समाजापर्यंत पोचवण्याचे कार्य या वृत्तपत्राने सातत्याने आणि निष्ठेने केले आहे. या वृत्तपत्राने बजावलेली भूमिका निश्चितच प्रेरणादायी आणि अभिनंदनास पात्र आहे. या कार्याच्या पुढील काळात अधिक यश लाभो, ‘सनातन प्रभात’ समूहातील सर्वांस श्री दत्त पद्मनाभ पीठाचे अनंत आशीर्वाद ! |

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !