
‘हिंदु राष्ट्र्रवाद आणि राष्ट्रीयत्व यांविषयीची तीव्र जाणीव गेल्या ५० वर्षांत वाढली नाही. याचे कारण ती वाढवावी, अशी इच्छाशक्तीच या देशाच्या राजसत्तेत नव्हती. तिचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन ज्या प्रमाणात घडेल, त्याच प्रमाणात हे राष्ट्र्र बलशाली अन् स्वत्वपरिपूर्ण होईल. आमची भाषा सर्वश्रेष्ठ, संस्कृती, धर्म, इतिहास, आमच्या परंपरा सर्वश्रेष्ठ, अशी राष्ट्र्रीय अहंमन्यता आणि अनुकरणाचा प्रभाव यांमुळेच राष्ट्र्र मोठे होऊ शकते, हे पाश्चात्त्य देशांनी दाखवून दिले आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासस्वामी, राणा प्रताप त्याचप्रमाणे आधुनिक क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, अशा दैेदीप्यमान राष्ट्र्राभिमानी विरांचे स्मरण या ठिकाणी अनाठायी ठरणार नाही.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, गोवा. (साभार : ‘भारतीय संस्कृती’)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !