‘अंगावर पाल पडणे किंवा सरडा चढणे’, यांचे फळ आणि अशुभ फळ असल्यास करायचे उपाय !

‘शास्त्र’ सदर : प्राचीन शास्त्र, सोप्या भाषेत

१. ‘अंगावर पाल पडणे किंवा सरडा चढणे’, यांचे फळ 

अ. ‘पुरुषांचे उजवे अंग, पोट, नाभी, हृदय किंवा मस्तक या ठिकाणी पाल पडली असता शुभ फळ जाणावे. पुरुषांच्या डाव्या अंगावर पाल पडल्यास अशुभ फळ जाणावे. हे सर्व स्त्रियांच्या संदर्भात उलट समजावे.

आ. पाल पडण्यासाठी जे फळ आहे, तेच त्या ठिकाणी सरडा अंगावर चढण्यासाठी जाणावे.

२. अशुभ फळ असल्यास हा दोष दूर करण्यासाठी करायचे उपाय

श्री. अमर जोशी

अ. पाल किंवा सरडा यांचा वरीलप्रमाणे स्पर्श झाल्यास लगेच अंगावरील वस्त्रांसहित स्नान करावे. शक्य असल्यास पंचगव्य (दूध, दही, तूप, गोमूत्र, गोमय आणि दर्भ भिजवलेले पाणी यांचे मिश्रण) प्राशन करावे.

आ. आज्यावलोकन करावे, म्हणजे पातळ केलेले तूप एखाद्या ताटलीत घेऊन त्यात आपला चेहरा बघावा. ‘पाल पडणे किंवा सरडा चढणे यांचा लागलेला दोष दूर व्हावा’, यासाठी इष्टदेवतेला प्रार्थना करावी. त्यानंतर ते तूप दिव्यात घालून तो दिवा देवासमोर लावावा.

इ. शक्य असल्यास ‘पल्लीसरठ शांति’, हा विधी करावा. यासाठी स्थानिक पुरोहितांचे मार्गदर्शन घ्यावे.’

(साभार : ‘धर्मसिंधु’ ग्रंथ)

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (८.४.२०२६)

‘वरील लिखाण आमच्या अल्पमतीनुसार आहे. यामध्ये विद्वानांना काही पालट सुचवायचे असल्यास किंवा अधिक माहिती उपलब्ध करून द्यायची असल्यास सनातन वेदपाठशाळेच्या ८१८०९६८६६० या दूरभाष क्रमांकावर संपर्क करावा’, ही नम्र विनंती !’ – श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (८.४.२०२६)