आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला यश !
सांगलीतील व्यापारी आणि उद्योजक यांच्याकडून पेढे वाटून आनंदोत्सव !

सांगली, ११ एप्रिल (वार्ता.) – सांगलीतील शेतकरी आणि व्यापारी यांच्या अनेक वर्षांच्या न्याय्य मागणीला शेवटी यश आले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करून कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याची अधिकृत अधिसूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आली आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी थेट मंत्रालय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय मार्गी लागला असून सांगलीच्या व्यापार जगतात आनंदाचे वातावरण आहे.
सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनासाठी ‘सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष अमरसिंह देसाई, समीर साखरे, शरद शहा आणि आणि सर्व चेंबरचे संचालक अन् सभासद पदाधिकारी यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी मार्केट यार्डमधील व्यापार्यांच्या समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव आणि त्रिभाजनाची तातडीची आवश्यकता यांवर प्रकाश टाकला होता. व्यापार्यांच्या समस्यांची गंभीर नोंद घेत आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री आणि पणनमंत्री यांच्याकडे प्रभावीपणे बाजू मांडली.
आता सांगली (मिरज तालुका), कवठेमहांकाळ आणि जत अशा ३ स्वतंत्र बाजार समित्या कार्यान्वित झाल्या आहेत. सांगली बाजार समितीचा निधी आता केवळ सांगलीच्याच विकासासाठी वापरला जाईल. यामुळे मार्केट यार्डाचा कायापालट होणार आहे. सांगलीसाठी सुनील चव्हाण (अध्यक्ष) आणि विपीन मोहिते, कवठेमहांकाळसाठी श्रीमती अनुष्का देशमुख आणि जतसाठी चेतन जावीर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्यांनी आमदार गाडगीळ यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.
|
सांगली बाजार समितीला आधुनिक बनवण्यावर आमचा भर राहील ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !