मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले !

मुंबई – महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या महिलेने तिला सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनासह अन्य लाभ न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या संदर्भात सुनावणी करतांना ‘लाडकी बहीण योजनेसाठी ४० सहस्र कोटी रुपये खर्च करता, मग निवृत्ती वेतन देण्यासाठी पैसे कसे नाहीत ? सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांना निवृत्तीवेतन, तसेच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील, तर लाडकी बहीण योजना बंद करावी’, अशा तीव्र शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.
…Else, scrap the ‘Ladki Bahin Yojana’ scheme
A retired BMC education dept employee moved the Bombay High Court after being denied pension as per the 7th Pay Commission.
⚖️ Court’s sharp remark: “If ₹40,000 crore can be spent on Ladki Bahin, how is there no money for… pic.twitter.com/eexLLWB1SC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 11, 2026
या याचिकेवर सुनावणी चालू असतांना महापालिकेच्या अधिवक्त्याने सांगितले की, सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन तसेच अन्य लाभ देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाहीत; कारण राज्य सरकार पैसे देत नाही.
महायुतीने विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी या योजनेचा पुष्कळ लाभ झाला होता. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला ४३ सहस्र ७४० कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. त्यानंतर सरकारने लाभार्थी महिलांच्या केलेल्या पडताळणी प्रक्रियेत ७१ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !