
थिरूवनंतपूरम् (केरळम्) – राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी इडुक्की जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सी.पी. मॅथ्यू यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यामध्ये मॅथ्यू यांनी म्हटले, ‘राजकीय संघर्षाची वेळ आली, तर महिला कार्यकर्त्यांनी स्वतःचा ब्लाऊज फाडून विरोधकांविरुद्ध छेडछाडीची तक्रार नोंदवावी.’ असे हे लज्जास्पद वक्तव्य मॅथ्यू यांनी एका निवडणुकीच्या सभेच्या वेळी केले.
‘Tear Your Blouse…’: Kerala Congress Leader Asks Partymen To Use Women To Entrap Poll Rivals
Idukki Congress leader CP Mathew allegedly suggested women leaders could tear their own clothes and lodge complaints in the event of a confrontation against political rivals
Dear… pic.twitter.com/4dIq0bXTGI
— Shehzad Jai Hind (Chowkidar as per INC ecosystem) (@Shehzad_Ind) April 7, 2026
१. व्हिडिओमध्ये सी.पी. मॅथ्यू असे म्हणतांना दिसतात की, विरोधकांना कायदेशीरदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी महिलांचा वापर करणे, हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. त्यांनी सुचवले की, महिला कार्यकर्त्यांनी स्वतःचे कपडे फाडून पोलिसांकडे तक्रार करावी. त्यामुळे प्रकरण अधिक बळकट होईल.
२. मॅथ्यू यांनी ‘अशी कृती करतांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या घटकातील महिलांनाही यात समाविष्ट करून घ्यावे, जेणेकरून अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विरोधी नेत्यांना कारागृहात पाठवता येईल’, असेही म्हटले.
३. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर माकपने काँग्रेसवर टीका केली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, हे केवळ कायद्याची थट्टा नसून काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानालाही धक्का बसला आहे.
मंचावर उपस्थित नेत्यांनी मौन बाळगले !
मॅथ्यू हे विधान करत असतांना मंचावर केरळम् काँग्रेसचे उपाध्यक्ष जेसन जोसेफ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. व्हिडिओमध्ये कोणत्याही नेत्याने मॅथ्यू यांना थांबवण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. (यावरून काँग्रेसच्या सर्व नेत्यांचा स्त्रीद्रोह दिसून येतो ! – संपादक)
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !