आखातातील युद्धाचा परिणाम

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आखातातील युद्धामुळे पाकिस्तानमध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे देशभरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि दुकाने रात्री ८ वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औषधांची दुकाने मात्र या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. पंजाब, बलुचिस्तान, इस्लामाबाद आणि पाकव्याप्त काश्मीर यांसह अनेक ठिकाणी हे नियम लागू केले जाणार आहेत. खैबर पख्तूनख्वामधील काही महत्त्वाच्या शहरांना मात्र रात्री ९ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे. व्यावसायिक ठिकाणांखेरीज लग्न समारंभ, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांनाही रात्री १० वाजेपर्यंतचीच वेळ देण्यात आली आहे.
पाकमध्ये पेट्रोल ४५८, तर डिझेल ५२० रुपये लिटर !
पाकिस्तानमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर ४५८ रुपयांवर, तर डिझेलचे दर प्रति लिटर ५२० रुपयांवर पोचले. सरकारने आता या दरात थोडी कपात करून पेट्रोल ३४८ रुपयांपर्यंत आणले असले, तरी हे दर सामान्य जनतेच्या खिशाला परवडणारे नाहीत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही भागांत महिनाभर विनामूल्य सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman