सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्वी सत्संगात मार्गदर्शन करतांना एकटेच अधिक बोलत असत. आता ते फारसे बोलत नाहीत. आता त्यांचा सत्संग लाभल्यावर साधकांमध्ये होणार्या पालटाविषयी सूत्रे जाणून घेऊया.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभल्यावर अनेक साधक उत्साही आणि सकारात्मक होऊन त्यांच्यामध्ये साधनेची तळमळ वाढणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘याआधी मी साधकांना भेटत होतो. तेव्हा एवढे साधक नव्हते. तेव्हा मी एकटाच बोलत असे. आता मी फारसे बोलत नाही. तुमच्या मनातील प्रश्न, अडचणी तुम्ही मला विचारता. मी तुम्हाला त्याची उत्तरे देतो. ‘साधकांना कोणत्या अडचणी येतात ’, हे मला शिकायला मिळते. मी एकटाच बोलत राहिल्यास तुमच्या मनातील प्रश्न तसेच रहातील. तुमच्या मनातील प्रश्न तसेच राहिल्यास तुम्हाला लाभ होणार नाही. आता सत्संगात साधक त्यांच्या साधनेतील अडचणी सांगतात, प्रश्न विचारतात. नंतर त्यांच्या स्थितीत थोडातरी पालट होतो का ?

सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३८ वर्षे) : हो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : कोणता पालट होतो ?
सौ. स्वाती शिंदे : आता साधक उत्साही दिसतात आणि सकारात्मक असतात. साधकांमध्ये साधनेचे प्रयत्न करण्याची तळमळ वाढलेली दिसते. त्यांना या सत्संगाचे स्मरण झाल्यावर ते भावस्थिती अनुभवतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान ! मी फारसे बोलत नाही, हे योग्यच आहे ना ! मी जे बोलतो, ते खरे म्हणजे सर्वकाही ग्रंथांत दिलेलेच आहे, तर मी आणखी वेगळे असे काय बोलणार ?
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोलण्याचा सूक्ष्मातून होणारा परिणाम महत्त्वाचा असणे

पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७९ वर्षे) : आता तुम्ही म्हणालात, ‘मी फारच अल्प बोलतो.’ ‘आपले बोलणे थोडेच असते; मात्र त्याचा परिणाम पुष्कळ होतो. तुमच्या बोलण्याचा परिणाम सूक्ष्मातून अधिक होतो’, असे मला वाटते. आपल्या थोड्या बोलण्याचा ७० ते ८० टक्के परिणाम हा सूक्ष्मातून होतो आणि जे बोलणे स्थुलातून होते, त्यातून सर्वांना शिकायला मिळते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. ते अधिक महत्त्वाचे आहे. स्थुलातून जे असते, त्याला फार किंमत नसते. सूक्ष्मातून जो परिणाम होतो, तोच खरा आणि महत्त्वाचा असतो. फारच सुंदर !’
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !