उन्हाळ्यात ताक घेत आहात… कोणती काळजी घ्यावी ?

ताक

अन्न वर येणे, घशात/छातीत आग होणे, तोंड आंबट पडणे अशा लक्षणांत ताक पिणे टाळावे. पचनासाठी ताक चांगले असते, हे वर्णन घरी लावलेल्या ताज्या विरजलेल्या दह्याच्या ताकासाठी आहे. बाहेर उष्ण वातावरण असता जेवणासह वाटीभर ताक (ताजे असले तरच) पुरेसे आहे.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

रिकाम्या पोटी, रात्री, भूक लागली म्हणून, ‘ॲसिडिटी’ (पित्त) वाटली म्हणून प्यायलेले ग्लासभर ताक त्यातून विकतचे, शिळे किंवा थंडगार असेल, तर पोटाला गच्च करते, वर दिलेले त्रास वाढवते, कफाचे त्रासही उत्पन्न करते आणि म्हणून थंड वातावरणात सर्दी, खोकला असतांना दही-ताक टाळण्याचा सल्ला दिला जातो. ही लक्षणे न्यून होण्यासाठी चार घास न्यून खाणे, औषधे आणि पथ्य घेऊन लक्षणे न्यून करणे अन् मग घरचे ताजे ताक चालू करणे उपयोगी ठरते. सध्याच्या उन्हाळी वातावरणात आणि त्यासह आता मध्ये मध्ये येणार्‍या पावसात घ्यायची, ही विशेष काळजी.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.