
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ स्टीव हांके यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय परराष्ट्रमंत्री गोंधळ किंवा गदारोळ यांपेक्षा धोरणात्मक विचारांना प्राधान्य देतात.
१. स्टीव हांके यांनी ‘एक्स’वर एक चित्र प्रसिद्ध केले. त्यामध्ये त्यांनी डॉ. एस्. जयशंकर यांच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करत त्यामागची भूमिका स्पष्ट केली. चित्राच्या एका बाजूला युद्ध, आर्थिक निर्बंध आणि अनिश्चिततेने ग्रस्त असलेले जग दाखवले आहे, जिथे विविध देशांचे नेते परस्परांमध्ये अडकलेले दिसतात. दुसर्या बाजूला डॉ. एस्. जयशंकर दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून दर्शवले आहेत.
२. डॉ. एस्. जयशंकर यांना जिन्यावर चढतांना दाखवले असून त्या जिन्यावर ‘डायव्हर्सिफाय’ म्हणजे भिन्नता, ‘डी रिस्क’ म्हणजे धोका अल्प करणे आणि ‘हेज्’ म्हणजे बचाव करणे, असे टप्पे दर्शवले आहेत. या चित्रातून असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, जगात चालू असलेल्या गोंधळात सहभागी होण्याऐवजी भारत दीर्घकालीन धोरणावर भर देत आहे. हे टप्पे सूचित करतात की, भारत जागतिक समस्यांमध्ये अडकण्याऐवजी स्वतःचा मार्ग निवडत पुढे जात आहे.
३. या संकल्पनांचा अर्थ असा की, कोणत्याही एका देशावर किंवा गटावर पूर्ण अवलंबून राहू नये. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये संतुलन राखत भारत विविध पर्याय उघडे ठेवत आहे, जेणेकरून एखादा मार्ग बंद झाला, तरी दुसरा उपलब्ध राहील. पुरवठा साखळीतील धोके लक्षात घेऊन भारत स्वतःचे अवलंबित्व अल्प करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून जागतिक संकटांचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ नये.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman