१. श्रीरामाचा नामजप करण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना !
‘१२.२.२०२६ या दिवशी माझे आणि सहसाधकाचे श्रीरामाच्या नामजपाविषयी बोलणे झाले होते. त्यानंतर २ – ३ दिवसांनी, म्हणजे १५.२.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्रीरामाचा नामजप करण्याविषयीची चौकट प्रसिद्ध झाली. तेव्हा ‘देवाने मला पूर्वसूचना दिली असावी’, असे मला वाटले.
२. श्रीरामाचा नामजप करतांना आलेल्या अनुभूती

अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीरामाच्या जपाविषयीची चौकट वाचताक्षणी माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप चालू झाला.
आ. श्रीरामाचा जप करतांना मला हनुमानाचे स्मरण होते आणि हनुमानाचे स्मरण झाले की, त्याने म्हटलेले वाक्य मला आठवते, ‘जिथे जिथे रामनाम असेल, तिथे तिथे मी असेन.’
इ. देवाच्या कृपेने हा जप करतांना मला एक वेगळाच आनंद मिळतो. तो आनंद अनुभवतांना मला वाटते, ‘या आनंदामुळेच हनुमंताकडून रामाचा नामजप सतत होत असेल.’
ई. हा नामजप करतांना माझे मन आपोआप एकाग्र होते. मला त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.
या सर्व अनुभूती दिल्याबद्दल मी देवाच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. मानसी प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.३.२०२६)

स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !