गाड्यांतील प्रवासी पुष्कळ वेळ गाडीतच अडकले !
(रोबोटॅक्सी म्हणजे चालकविरहित, स्वयंचलित टॅक्सी)
वुहान (चीन) – चीन, तसेच पाश्चात्त्य देशांमध्ये ‘रोबोटॅक्सी’विषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. अनेक शहरांमध्ये त्यांचा वापरही चालू झाला आहे. अशात चीनच्या वुहान शहरात मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे १०० हून अधिक रोबोटॅक्सी अचानक रस्त्यावर थांबल्या. त्यामुळे गाड्यांमध्ये बसलेले प्रवासी आतच अडकून पडले.
🇨🇳 Over 100 Robotaxis reportedly glitched and came to a sudden halt, leaving passengers trapped inside for hours.
Is the future of AI transport ready for the road? 🚕🤖#Wuhan #Robotaxi #TechFail #SelfDrivingCars #ChinaNews pic.twitter.com/eLKvMNaFib
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 5, 2026
चीनमधील ‘बायडू’ आस्थापनाच्या ‘अपोलो गो’ या चालकविरहित टॅक्सींनी काही दिवसांपूर्वी रात्री अनुमाने ९ वाजता अचानक काम करणे थांबवले. या गाड्या वाहतुकीच्या मध्यभागीच थांबल्याने अन्य गाड्यांनाही धोका निर्माण झाला. प्राथमिक तपासात ही घटना प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे सांगितले गेले.
जेव्हा रोबोटॅक्सी अचानक थांबल्या, तेव्हा त्यांच्या ‘स्क्रीन’वर प्रणालीत बिघाड झाल्याचा संदेश दिसला. ‘५ मिनिटांत कर्मचारी पोचतील’, असाही संदेश दिसला. तथापि बराच वेळ कुणीच न आल्याने प्रवाशांनी स्वतःच एस्.ओ.एस्. बटण (धोका दर्शवणारी सूचना) दाबून ते गाडीतून बाहेर पडले.
रोबोटॅक्सी’ बंद पडल्याच्या याआधीच्या घटना
१. डिसेंबर २०२५ : अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे ‘वेमो’ आस्थापनाच्या गाड्या वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे थांबल्या होत्या.
२. ऑगस्ट २०२५ : चीनच्या चोंगकिंग येथे एक रोबोटॅक्सी बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात पडली.
तज्ञांच्या मते, स्वयंचलित गाड्या मानवी चुका अल्प करू शकतात; पण तांत्रिक बिघाडामुळे नव्या प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो.

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman