
‘मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्र म्हणून ‘पाकिस्तान’ म्हणून जन्माला आले. जीनांना हिंदुस्थानात हिंदूंबरोबर रहायचे नव्हते. त्यांनी हट्टाने ८ कोटी मुसलमानांसाठी म्हणून पाकिस्तान मागून घेतला. आपणही ‘हे अंतर्वैर संपावे’, या भावनेने ते तोडून दिले; परंतु त्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेल्या प्रदेशातील हिंदूंना ज्या क्रूर व भयावह पद्धतीने मारून, रक्तबंबाळ करून, अत्याचार करून ठार मारण्यात वा हाकलून देण्यात आले, तो प्रकार कितीही विसरावे म्हटले, तरी विसरता येणार नाही. ‘डायरेक्ट ॲक्शन’ या नावाने कलंकित असणारी ती चळवळ तेथे असलेल्या हिंदूंच्या हत्येचाच पद्धतशीर कार्यक्रम होता.’
‘हे सर्व होऊनही पाकिस्तानविरहित उर्वरित भारताला या राजकारण्यांनी ‘सेक्युलर’ (निधर्मी) ठरवला. मुसलमानांसाठी पाकिस्तान तोडून दिल्यावर उरलेला भाग हा हिंदुस्थानच असायला हवा होता; पण उदारबुद्धीच्या हिंदूंना सर्वधर्मसमभावाचा (सेक्युलॅरिझमचा) उदारपणा हिंदु धर्माचा घात व्हायला कारणीभूत होईल, हे लक्षात आले नाही. खर्या अर्थाने पाहिले, तर हिंदु धर्म हा परधर्मियांचा द्वेष करणारा नाही. हिंदुत्व हेच तसे ‘सेक्युलर’ आहे.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथातून)
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !