‘मागील एका मासापासून भारतात प्रत्यक्ष चालू झाले नसले, तरी आखातात चालू असलेल्या युद्धाची झळ भारताला बसत आहे. यात एक विशेष निदर्शनास आले, ते म्हणजे गेल्या १५ दिवसांत भारतात विविध जिल्ह्यांत आणि लष्करी तळांच्या ठिकाणी आढळलेला परकीय गुप्तचरांचा वावर ! यात काही भारतातील सूर्याजी पिसाळही होते. (टीप : छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळात सूर्याजी पिसाळ सातारा जिल्ह्यातील वाईचा वतनदार होता. त्याने मोगलांशी हातमिळवणी करून स्वराज्याशी फितुरी केली होती.)
काही ठिकाणी शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली. देशात अंतर्गत बंडाळी माजवण्यासाठी अमेरिकेचा एक आणि युक्रेनचे काही अशा घुसखोरांना पोलिसांकरवी अटक झाल्याची बातमीही आली. या पार्श्वभूमीवर युद्ध केवळ सीमेवर चालू आहे, असे नसून त्यांची भीषणता देशाच्या आतही तितकीच काळजी करण्यासारखी आहे. यासाठी या देशद्रोह्यांची झाडाझडती घेण्याची मोहीम सरकारने राबवून प्रत्यक्ष युद्ध चालू होण्यापूर्वीच त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, अन्यथा हे लोक युद्धकाळात किती त्रासदायक ठरतील, याची कल्पनाही करता येत नाही.

१. देशद्रोह्यांना वेळीच वठणीवर आणण्याची आवश्यकता !
सध्या पाकिस्तानमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी आतंकवाद्यांना ठार केल्याच्या बातम्या मध्ये मध्ये वाचून कळते. हे अज्ञात कोण आहेत, हे ठाऊक नाही; पण सरकारने देशांतर्गत शत्रू शोधण्याकडेही लक्ष्य द्यायला हवे. देशाच्या सीमेवरील शत्रू स्पष्ट असल्याने त्याला तेथेच संपवणे एकवेळ सोपे असते; परंतु सर्वांमध्ये राहून आपल्याच देशाचे खाऊन देशद्रोह करणार्यांची घाण वेळीच स्वच्छ केली नाही, तर प्रत्यक्ष युद्ध चालू झाल्यावर आपल्या लष्कराला दुहेरी ताण येऊ शकतो.
२. विदेशींना साहाय्य पाठवणार्यांवर करडी दृष्टी हवी !

जम्मू-काश्मीरमध्ये नुकतीच उघडपणे इराणमधील लोकांना साहाय्य करण्यासाठी धर्मांधांनी चळवळ राबवली आणि या चळवळीला लोकांचा भरघोस पाठिंबाही मिळाला. यातून या लोकांची नाळ कुठे जोडलेली आहे, ते कळते. मागे जम्मू-काश्मीरमध्ये भूकंप झाला, काही वर्षांपूर्वी पूरग्रस्त परिस्थिती उद्भवली आणि त्यानंतर ‘कोरोना’ची महामारी आली, तेव्हा या लोकांना भारत सरकारने अन् भारतीय सैन्याने साहाय्य केले. तेव्हा यांपैकी काही लोकांनी सैन्यावर दगडफेकही केली होती, हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे अशा लोकांकडे मानवतावादी दृष्टीकोनातून ते साहाय्य करत असतील, असा आंधळा विचार करून चालणार नाही, तर त्यांच्यावर ‘ते देशावर कधीही उलटू शकतात’, हे लक्षात घेऊन करडी दृष्टी ठेवायला हवी. जम्मू-काश्मीरला हा भाग उघडपणे झाला, तरी संपूर्ण देशातच ही चळवळ राबवली गेली असणार आहे, यात शंका नाही. या दृष्टीने सरकारने अशांच्या बलस्थानांचा शोध घ्यायला हवा. या लोकांचे अधिकोशाचे व्यवहार, आभासी चलन, हवाला असे सर्व प्रकारचे व्यवहार गृहीत धरून चौकशी करायला हवी.
३. देशद्रोह्यांच्या पाठीराख्यांना अज्ञातवासात पाठवा !
जम्मू-काश्मीरचे कलम ३७० रहित करतांना भारत सरकारने एक चांगले काम केले होते, ते म्हणजे तेथील देशद्रोही आणि फुटीरतावादी यांचे पाठीराखे नेते यांना काही काळ नजरकैदेत ठेवले. तसे संपूर्ण भारतात या देशद्रोह्यांचे अनेक पाठीराखे आहेत. त्यांच्यापैकी काही जण उघडपणे शत्रूदेशाचे कौतुक करतात. भारतात हिंदूंना भाईचारा शिकवतात आणि धर्माच्या नावाखाली तथाकथित अल्पसंख्यांकांवर अन्याय होत असल्याची बांग नियमित देत असतात. हे जे लोक भारतातील अल्पसंख्यांकांना चिथावत असतात, त्यांची स्वतःची मुले सरकारच्या अनुदानाने विदेशात शिकतात आणि हे येथे लोकांना त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा कांगावा करून देशाच्या विरोधात त्यांच्या मनात असंतोष निर्माण करत रहातात. त्यामुळे सरकारने अशा पाठीराख्यांना हेरून अज्ञातवासात पाठवायला हवे.
देशद्रोही पकडल्यावर थेट कारवाई करण्याचे प्रावधान हवे !
याचे कारण असे की, या देशद्रोह्यांना पकडून आपल्या देशातील न्यायप्रक्रियेच्या माध्यमातून शिक्षा होण्यात बराच कालावधी आणि पैसा या दोन्हींचा व्यय होणार आहे. त्यांना द्याव्या लागणार्या अधिवक्त्यांचा वेगळा व्यय सरकारला करावा लागणार आहे. हे लोक स्वतःची फाशी टाळण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना झोपेतून रात्री-अपरात्री उठवणार. या देशद्रोह्यांना फाशी दिल्यानंतर त्यांचा जनाजा (अंत्ययात्रा) काढतांना लाखोच्या संख्येने यांचे आप्तबंधू एकत्र येत असल्याने यातूनही देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. तेथेही भारतीय पोलीस प्रशासन, निमलष्करी दल, सीमा सुरक्षा दल असे कितीतरी मनुष्यबळ नाहक कामाला लागणार आहे.
त्यामुळे…
१. असे देशद्रोही सापडल्यावर त्यांना थेट लष्करी अधिकार्यांच्या कह्यात द्यावे.
२. त्यांची संपर्कयंत्रणा अत्याधुनिक पडताळणीद्वारे शोधावी.
३. आवश्यक माहिती मिळाल्याचे लक्षात येताच त्यांना फाशी देण्यात यावी.
४. याविषयीचा अधिकार भारतीय सैन्याला देण्यात यावा.
असे केल्याने धर्मांध, जिहादी आणि देशद्रोही यांना धाक निर्माण होईल.
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह.
४. जागृत राष्ट्रप्रेमी नागरिकांनीही सरकारला साहाय्य करायला हवे !
ही सर्व पूर्वसिद्धता सरकारने प्रत्यक्ष युद्ध चालू होण्यापूर्वीच करणे आवश्यक आहे. सरकार याविषयी काही कृती करत असेल, तर लोकांनीही सरकारला सतर्कतेने साहाय्य करायला हवे. आपण समाजात वावरत असतांना अनेक गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटू शकतात, त्यांकडे दुर्लक्ष न करता त्या पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या. देशविरोधी घटनांविषयी जागृत राहून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासन दरबारी आग्रही रहायला हवे. ‘देशहित सर्वाेपरि’ लक्षात घेऊन केवळ सरकार, लष्कर आणि पोलीस यांच्यावर विसंबून न रहाता एका सजग प्रहरीप्रमाणे आजूबाजूला लक्ष ठेवणे आवश्यक आहे. देशवासियांनो, ‘रात्र वैर्याची आहे’, हे लक्षात घेऊन सतर्क व्हा ! देश, धर्म अन् समाजबांधव यांच्या रक्षणासाठी कृतीशील व्हा !’
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (२८.३.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !