
भोपाळ (मध्यप्रदेश) – दतिया येथील काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांना देहलीतील खासदार-आमदार न्यायालयाने ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यांना तिहार कारागृहात पाठवण्यात आले आहे. बँकेत मुदत ठेव चुकीच्या पद्धतीने वाढवून घेण्याचा त्यांच्यावर आरोप होता.
१. राजेंद्र भारती यांच्या आईच्या नावावर १० लाख ५० सहस्र रुपयांची मुदत ठेव दतिया जिल्हा सहकारी ग्रामीण विकास बँकेत होती. या ठेवीवर १३.५० टक्के व्याजदर मिळत होता.
२. ही ठेव ३ वर्षांवरून १५ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली होती. या प्रकरणी बँकेतील कर्मचारी नरेंद्र सिंह यांनी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत खासदार-आमदार न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
३. दतिया येथील आमदार राजेंद्र भारती हे काँग्रेसचे प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी मागील मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा पराभव केला होता. ते तिसर्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचारी, लुबाडणारे आदींचा भरणा असलेली काँग्रेस जनतेचे भले काय करणार ? अशा काँग्रेसवर आता बंदीच घातली पाहिजे ! |
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani