
इस्लामाबाद – पाकिस्तान आर्थिक टंचाईच्या अशा टप्प्यावर पोचला आहे की, सरकारला नागरिकांच्या उत्पन्नापुरतेच नव्हे, तर म्हशीच्या शेणातही महसुलाचा स्रोत दिसू लागला आहे. पाकिस्तानातील सर्वांत मोठ्या पंजाब प्रांतातील मरियम नवाज यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘सुथरा पंजाब’ या नावाने एक वसुली मोहीम चालू केली असून त्यामध्ये म्हशीच्या शेणावर कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे.
१. पंजाब सरकारच्या नव्या आदेशानुसार प्रांतातील १६८ पशूधन वसाहतींमध्ये पाळल्या जाणार्या प्रत्येक म्हशीच्या शेणावर प्रतिदिन ३० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
२. सरकारचा दावा आहे की, या शेणाचे संकलन करून त्यापासून जैववायू बनवला जाईल आणि शहरांतील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होईल; मात्र नागरिक याला पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून न पहाता आर्थिक टंचाईमुळे लादलेला कर मानत आहेत.
३. पाकिस्तानातील दुग्धव्यावसायिक आणि लहान शेतकरी आधीच महागाई, चार्याच्या वाढत्या किमती आणि विजेची टंचाई यांमुळे अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत हा कर त्यांच्या अडचणीत अधिक भर घालणारा ठरत आहे.
४. विरोधकांनी या कराला लाजिरवाणा निर्णय म्हटले आहे. यामुळे पंजाब प्रांताकडे महसूल उभारणीचे ठोस साधन उरले नसल्याचे दिसून येते, अशी टीका त्यांनी केली आहे.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता