
मागील वर्षी नागपूरमध्ये ऐन रमजानच्या काळात धर्मांधांनी दंगल केली; पण शांततामय मार्गाने निदर्शने करणार्या हिंदूंनाच आरोपी बनवण्याचा एका इंग्रजी दैनिकाच्या बातमीचा मथळा नुकताच समोर आला. त्या मथळ्यात नागपूर दंगलीत १३ पैकी १२ धर्मांधांवर गुन्हे नोंद झाले; मात्र १३ वा गुन्हा, जो विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यावर आहे, तो अजून आरोपपत्रात घातला नसल्याचे म्हटले आहे. केवळ धर्मांधांनाच दोषी कसे दाखवावे ? मथळ्यात एक का असेना; पण हिंदूलाही दंगलीत गोवले, तर दोन्हीकडे रोख येईल; असा गुप्त पोटशूळ ठेवूनच या दैनिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले कि काय ? असेच वाटते.
मुळात दंगेखोर धर्मांध आणि पीडित हिंदू यांना हे दैनिक एकाच तराजूत तोलत आहे. खरेतर नागपूर दंगलीत धर्मांधांनी हिंदु घरांची ‘रेकी’ (टेहाळणी) केली होती, मग आक्रमण केले; त्यातही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या घरांवर दगड भिरकावण्यात आले. देवतांची चित्रे असणार्या त्यांच्या गाड्या मुद्दाम जाळण्यात आल्या. हिंदूंची घरे आणि गाड्या दोन्हीही चिन्हांकित करण्यात आल्या होत्या. धर्मांधांनी पोलिसांवरही आक्रमण केले. त्यांचे कपडे फाडले. ३ पोलीस उपायुक्त घायाळ झाले, एका उपायुक्तांच्या तर कुर्हाडीने हातावर मारले, अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांना घायाळ केले, एका ५ वर्षीय बालिकेवरही धर्माधांनी दगड भिरकावला. या जिहादी गोष्टींची साधी पुष्टीही त्या वृत्तपत्राला त्या वृत्तात करावी वाटली नाही. ही दंगल झाल्यावर सोज्वळ धर्मांध पुढे येऊन माध्यमांना वारंवार सांगत होते, ‘‘यात कुणी स्थानिक नव्हतेच.’’ मग या धर्मांधांनी दंगेखोरांना विरोध का केला नाही ? स्थानिकांच्या साहाय्याविना दंगल घडणे शक्य आहे का ?

यातील प्रमुख आरोपी फहीम शमीम खान याने ४ महिने कारागृहात काढले, त्याला पुढे जामीन मिळाला. त्याचे अनधिकृत घर महानगरपालिकेने ते पाडले; मात्र त्याने परत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आणि न्याययंत्रणांनी त्याला पीडित म्हणून हानीभरपाई देण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे याच काळात या धर्मांधाची बायको येथील नगरसेवक झाली. थोडक्यात स्थानिक धर्मांधांनी तिलाच निवडून दिले ! हे काहीही या वृत्तात आले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात दंगलखोर धर्मांधाचे उदात्तीकरण होऊनही हिंदूंनाच दोष देण्यात येत आहे, यापेक्षा दुर्दैव ते काय ? ज्या दिवशी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला, त्यामध्ये ५०० हून अधिक लोक सहभागी त्यात केवळ ८७ आरोपींविरुद्ध जून २०२५ मध्ये १९०० पानी आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते. याविषयी या दैनिकाने कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. त्यामुळे केवळ हिंदूंना लक्ष्य करणारी अशी वृत्ते देऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ नेमके काय साधत आहे ?
– श्री. नीलेश देशमुख, तळोजा, नवी मुंबई.
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?