|

मुंबई – अंदमानच्या सेल्युलर कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर आणि इतर सर्व क्रांतीकारक यांना बैलाच्या जागी कोलूला जुंपले जायचे. ८ घंट्यांत ३० पाऊंड, म्हणजे साडेतेरा ते चौदा लिटर तेल काढावे लागत असे. तेल पूर्ण न झाल्यास न थांबता कोलू फिरवावा लागे आणि अमानुष शिक्षाही केल्या जात. या अघोरी छळाला कंटाळून इंदूभूषण राय यांसारख्या अनेक क्रांतीकारकांनी आत्महत्या केली, तर उल्हासकर दत्त यांच्यासारख्या अनेक वीरांचे मानसिक संतुलन बिघडले. अशा असंख्य क्रांतीकारकांचा अपार त्याग आणि बलीदान यांमुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
🇮🇳 Experience the Pain of Freedom Fighters
At Swatantryaveer Savarkar National Memorial, get a glimpse of the brutal hardships endured by our revolutionaries
⚙️ Work the manual oil press (Kolhu)
⛓️ With legs shackled in heavy chains
🔥 Feel their sacrifice & struggle
🗓️ 4th… pic.twitter.com/j6XBrYbIKR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 2, 2026
त्यांची झालेली स्थिती अनुभवण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’ने राष्ट्रप्रेमींना कोलू चालवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. उपक्रमात सहभागी होणार्यांना अधिकाधिक १५ मिनिटे कोलू फिरवण्याची संधी मिळणार आहे. क्रांतीकारकांनी भोगलेल्या यातनांचा थोडातरी अनुभव घेता यावा, यासाठी पायांत बेड्या घालूनच कोलू फिरवायचा आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ४ आणि ५ एप्रिल या दोन्ही दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत हा उपक्रम घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ‘गूगल’ अर्ज भरून वेळेची निश्चिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीविषयी शंका असल्यास ९२२००७०३८६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पायात बेड्या घालायच्या असल्याने पुरुषांनी पूर्ण विजार किंवा महिलांनी सलवार घालून यावे, म्हणजे पायाला इजा होणार नाही, असे स्मारकाच्या वतीने कळवले आहे.
| ‘गूगल अर्जा’ची लिंक – https://forms.gle/SVexjX6RbcNCTJFz6 |
उपक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र त्याच दिवशी देण्यात येईल. कोलू फिरवून निघालेले तेलही उपक्रमाच्या २ दिवसांनी सर्वांना देण्यात येईल. स्वातंत्र्याचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी या उपक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न