‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधक नामजपादी उपाय करतात, त्या खोलीत मारुतिरायाचे चित्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवले आहे. त्याकडे पाहून मला पुढील काव्य सुचले.

सांग ना रे बालहनुमंता । काय केलेस तू ? ।।
धैर्य कसे या बालकास । घेण्या निघाला सूर्याचा ग्रास ।। १ ।।
सांग ना रे पवनसुता । काय केलेस तू ? ।।
बुद्धी किती श्रेष्ठ तुझी । गेला ओळख पटविण्या रामाची ।। २ ।।
सांग ना रे अंजनीसुता । काय केलेस तू ? ।।
सीतामातेला शोधण्यासी । गेलास उल्लंघूनी समुद्रासी ।। ३ ।।

सांग ना रे मारुतिराया । काय केलेस तू ? ।।
राक्षसासी निर्दालण्या सदा । प्रहारसी प्रचंड गदा ।। ४ ।।
सांग ना रे केसरीनंदना । काय केलेस तू ? ।।
आत्मविश्वास केवढा तुला । पेटविलेस त्या सुवर्णलंकेला ।। ५ ।।
सांग ना रे बजरंगबली । काय केलेस तू ? ।।
काय वर्णावी तुझी शक्ती । औषधासाठी उचलला पर्वत ।। ६ ।।
हनुमंत म्हणे,
‘सांगतो मी गुपित तुला । काय केले मी ? ।।
मी झालो रामाचा दास । अन् हृदयी बसविले रामास ।। ७ ।।
मुखी घेतले नाम रामाचे । ध्यान केले अंतरी रामाचे ।।
कार्य केले देहाने रामाचे । रामरूप झाले या चिरंजीवाचे’ ।। ८ ।।
– सौ. अंजली अजय जोशी, ढवळी, फोंडा, गोवा.
(२९.४.२०२५)
हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार कदापि करू नका !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !