
नागपूर, २९ मार्च (वार्ता.) – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे विविध उपक्रम घेण्यात आले. त्यात विविध मंदिरांत ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन, तसेच विक्री कक्ष उभारण्यात आले. अनेक जिज्ञासूंनी त्याचा लाभ घेतला. श्रीराम जन्मोत्सव आणि श्रीराम नवरात्र यांनिमित्त अनेक ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. त्यात श्रीरामाची भक्ती होण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि रामराज्य येण्यासाठी प्रत्येकाने करावयाचे प्रयत्न या संदर्भात माहिती देण्यात आली. याचा पुष्कळ जिज्ञासूंनी लाभ घेतला.
पश्चिम नागपूर येथील श्रीराम मंदिरातून निघालेल्या शोभायात्रेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त विद्यमाने सहभाग घेतला. या वेळी विविध मंदिरांचे विश्वस्त, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे, साधक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. शोभायात्रेत साधक श्रीरामाचा नामजप करत होते. शोभायात्रा पहाणारेही नामजप करू लागले. धर्मशिक्षण फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
क्षणचित्र – साधकांचे शिस्तबद्ध वर्तन लक्षवेधी होते.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !