चित्रपट समीक्षण…
हिंदूंचा, म्हणजेच देशातील काफिरांचा वंशविच्छेद करण्यासाठी आजच्या काळातील शांततामय मार्गाने, प्रेमपूर्वक रचलेले क्रूर षड्यंत्र ‘लव्ह जिहाद’ ! यावर अत्यंत नाट्यमय; परंतु धगधगत्या ज्वाळेप्रमाणे प्रकाश टाकणारा चित्रपट, म्हणजे ‘द केरला स्टोरी २’ होय. या चित्रपटाचे समीक्षण एक हिंदुत्वनिष्ठ म्हणून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.

१. मानवी मनाचे यथार्थ भावनिक चित्रण करणारा चित्रपट !
चित्रपटाद्वारे ‘लव्ह जिहाद’ची समस्या किती खोलवर रुजली आहे, याचा नेमकेपणाने (टू द पॉईंट) प्रयत्न निर्माते विपुल शहा यांनी केला आहे. त्यांच्या, तसेच अमरनाथ झा यांच्या लेखणीतून साकार झालेला हा चित्रपट ‘हिंदूंना बाटवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जात आहेत ?’, ‘मानवी भावनांचा कशा पद्धतीने अपलाभ उठवला जात आहे ?’, ‘मानसशास्त्राद्वारे मुलींच्या मनावर कथित प्रेमाचा पगडा कसा निर्माण केला जात आहे ?’, हे सत्य गोष्टी रूपातून चितारतो.
२. निर्मिती, लेखन, दिग्दर्शन, ‘एडिटिंग’ (संकलन) अत्यंत सरस… दर्शकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी !

चित्रपटात ३ वेगवेगळ्या ठिकाणच्या हिंदु मुलींचे आयुष्य दाखवले आहे, जे काही अंशी चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधून समोर आले होतेच. तिघींची जडणघडण वेगळी, तिघी वेगवेगळ्या जातींतील, तिघींची कुटुंबव्यवस्था वेगळी. तिघींचा आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोनही निराळा. तरी तिघींना ‘जिहादी प्रेमा’त गुंतवण्यामागील हेतू एक – धर्मांतर. तिघींनाही योग्य मार्गावर, ‘अल्ला’च्या मार्गावर आणण्याचा हेतू चित्रपटातील लव्ह जिहादी साकारतात.
लव्ह जिहाद्यांचे मनसुबे किती विकृत आहेत, हे त्यांच्या कृत्यांतून तंतोतंत समोर आणण्यात आले आहे, हे माझ्यासारखा पत्रकार ठामपणे सांगू शकतो. आम्ही ‘सनातन प्रभात’द्वारे ‘लव्ह जिहाद’च्या घटनांचे वार्तांकन करतो, त्या प्रकाशित करतो. या षड्यंत्राला अत्यंत जवळून पहाण्याचे आमचे सेवाकार्य आहे. त्यामुळे या लव्ह जिहाद्यांचा विकृत चेहरा खरेच चित्रपटातून समोर आणण्यात निर्माते शहा आणि दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांना यश आले आहे, असेच म्हणता येईल.
तिघींच्या जीवनाला कलाटणी देतांना नि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे पहातांना कुठेही चित्रपट ओढल्याप्रमाणे वाटत नाही. प्रत्येक दृष्यानंतर (‘सीन’नंतर) ‘पुढे काय होणार ?’ ही उत्कंठा संपूर्ण चित्रपटात जागृत रहाते. चित्रपटाचे ‘एडिटिंग’ अत्यंत सरसप्रकारे करण्यात आल्याचे दर्शकांना चित्रपट पहातांना पदोपदी जाणवते. चित्रपटाचे ‘एडिटर’ संजय शर्मा यांचे परिश्रम सार्थकी लागले आहेत.
३. तिन्ही अभिनेत्रींचा अभिनय हिंदु मुलींना डोळसपणा देण्यात यशस्वी !
ऐश्वर्या ओझा, अदिती भाटिया आणि उल्का गुप्ता या ३ अभिनेत्रींनी ‘लव्ह जिहाद’मध्ये फसतांनाचा त्यांचा अभिनय हिंदु मुलींच्या मनावर ठसला असणार, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ‘माझा अब्दुल’ तसा नाही’, असे म्हणण्यातील फोलपणा आणि आमच्यासारखे हिंदुत्वनिष्ठ ‘हिंदु मलींनी जागृत होणे का आवश्यक आहे ?’, हे पोटतिडकीने का सांगत आहेत, हे या तिघींच्या सुरेख अभिनयातून समोर येते. यासाठी त्या तिघींचे अभिनंदन !
‘लव्ह जिहाद’चा तिघींच्या जीवनावर पडलेला प्रभाव हा वेगळा आहे. तो जगतांना त्यांच्या मनाची झालेली घालमेल, तिघींना भोगाव्या लागणार्या यातनांची झळ त्यांच्या चेहर्यांतून दर्शकांना उद्विग्न करून सोडते. ज्याप्रकारे लव्ह जिहादी भोळ्या मनाच्या आणि आधार शोधणार्या हिंदु मुलींच्या मनाचा ठाव घेतात, अगदी त्या प्रकारेच या भाबड्या हिंदु मुलींच्या मनाला चित्रपटातील सत्य कथांतून डोळसपणा देणारे कार्य तिन्ही अभिनेत्रींना जमले आहे, हे त्यांचे सर्वांत मोठे यश म्हणता येईल.
४. इस्लामी विचारसरणीच्या गाभ्याचे यथार्थ चित्रण !
इस्लाम हा ख्रिस्ती धर्मानुसार ‘एक्सक्लुझिविस्ट’, म्हणजेच बहिष्कारवादी. ‘भगवंताकडे, अल्लाकडे जाण्याचा मार्ग एकच – तो म्हणजे इस्लाम. तो सोडून अन्य कोणताही मार्ग हा पाखंड नि अधर्म’, अशी शिकवण जिहाद्यांच्या मनात भिनवली जाते. ‘लव्ह’ जिहादी याला केवळ प्रेमाचा मुलामा देतात एवढेच ! लव्ह जिहाद्यांमधील धर्मांधता त्यांना कशा प्रकारे विचार करण्यास प्रवृत्त करते, हे कळीचे संवेदनशील सूत्र धडाडीने चित्रपटाद्वारे मांडण्यात आले आहे. ‘पाॉलिटिकली इन्करेक्ट’ (राजकीयदृष्ट्या अडचणीचे) असे सूत्र ‘मेनस्ट्रीम’ चित्रपटाद्वारे मांडण्यात येणे, हे या चित्रपटाचे मुख्य गमक होय.
५. हिंदूंमधील एकजुटीचा अभाव कारणीभूत !
आज पाहिले, तर इस्लामी आणि ख्रिस्ती धर्म संघटित आहेत – स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय अथवा जागतिक स्तरावर. ‘मुस्लिम ब्रदरहुड’ ही जागतिक मुसलमान संघटना असो कि ‘कॅथोलिक चर्च’ असो, दोन्ही व्यवस्था सुसंघटित (organized) पद्धतीने कार्यरत आहेत. त्यामुळेच दोन्ही धर्मांचा जगावर दबदबा आहे. हिंदूंचे स्थानिक स्तरावर एकत्रीकरण होणे, हीसुद्धा एक जटिल समस्या आहे. याचे भयावह वास्तव हा चित्रपट साकारतो. त्यामुळे हिंदु समस्यांमागील हा महत्त्वपूर्ण पदर उलगडून दाखवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

६. उपाययोजनात्मक दिशा मिळणे आवश्यक !
समस्या मांडणारे अनेक असतात. समस्या मांडून ती सोडून देणे, असेच बहुधा पहावयास मिळते. खरेतर समस्या मांडून त्यावर उपाययोजना सुचवणे प्रायोगिक स्तरावर आवश्यक ठरते. चित्रपटातून तो प्रयत्न नेमकेपणाने करण्यात आला आहे. हिंदूंनी यातून तरी प्रेरणा नि दिशा घेऊन आपापल्या क्षेत्रात – कॉलनीत (वसाहत), इमारतीमध्ये, गावात, शहरात संघटित होण्यास आरंभ करावा, अशी निर्माते आणि दिग्दर्शक यांची सार्थ अपेक्षा दिसून येते.
७. प्रत्येक – प्रत्येक हिंदु मुलीने पहावा असा चित्रपट !
व्यक्ती तितक्या प्रकृती तितके संस्कार, तितके दृष्टीकोन, तितके विचारप्रवाह. या चित्रपटाने त्या प्रत्येक दृष्टीकोनाला, त्या प्रत्येक विचारप्रवाहाला उत्तर देतांना ‘लव्ह जिहाद’मध्ये मुलींनी अडकू नये’, असा धगधगता संदेश दिला आहे. तुम्ही उदारमतवादी असाल कि धर्मनिरपेक्षतावादी, तुमच्यात धर्मप्रेमाचा अभाव असो कि धर्मशिक्षणाचा… अशा प्रत्येक सामाजिक विचारसरणींना चित्रपट पुरून उरतो आणि हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, अशी तीव्र तळमळ जोरजोरात ओरडून व्यक्त करतो.
‘लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींनी काय करावे ?’, हेसुद्धा चित्रपटातून दिशादर्शित करण्यात आले असल्याने त्या पीडितांनीही चित्रपट पहावा.
थोडक्यात ‘प्रत्येकाचा अब्दुल एकच आहे’, हे कटाक्षाने प्रदर्शित करणारा हा चित्रपट प्रत्येक हिंदु स्त्रीने (विशेषकरून विद्यार्थिनी, युवती यांनी) पहाणे काळाची मागणी आहे, हे मी कळकळीने सांगून माझे समीक्षण येथेच थांबवतो.
– श्री. विक्रम डोंगरे, उपसंपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (२४.३.२०२६)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !