
‘इअर पॉड’ (भ्रमणभाषमधील ऐकण्यासाठी कानात घालावयाचे लहान आकारातील विनातारेचे एक यंत्र), सतत ‘स्क्रीन’ (भ्रमणभाषकडे) पहावा लागणे किंवा पाहिला जाणे यांमुळे ज्ञानेंद्रियांची हानी होतेच. यासह ‘सर्व्हायकल स्ट्रेन’ (मानेच्या स्नायूंना होणारी दुखापत) आणि जबड्याच्या सांध्यांचे आखडले जाणे, हे त्रास होतात. सतत ‘इअर पॉड’ वापरणे, ते कानात घालून ठेवणे, तसेच एके ठिकाणी सतत बघत रहाणे यांमुळे मानेच्या मणक्यांवर अधिकचा ताण येतो, याला म्हणतात ‘टेक नेक’ ! या व्यतिरिक्त ‘इअर बड’ जागेवर रहावे म्हणून नकळतपणे जबड्याचा सांधा आपोआप घट्ट पकडून ठेवला जातो आणि त्यामुळे सतत ते अधिक दिवस वापरले असता जबड्याचा सांधा दुखणे अन् त्यासंबंधी स्नायूदुखी या प्रकारचे लक्षणे घेऊनही रुग्ण येत आहेत. (temporomandibular joint clenching).

प्रतिदिन जिममध्ये (आधुनिक व्यायाम शाळेत) ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’ करतांना, म्हणजेच व्यायामाच्या अंतर्गत वजन उचलतांना स्नायूंना आलेला अतिरिक्त ताण, ‘इअर बड’चा जबड्याच्या सांध्यावर येणारा ताण, तो सांभाळायला नकळत घेतले जाणारे चुकीचे ‘पोश्चर’ (ठेवण) यांचे परिणाम होऊन ‘लॉक जॉ’ (जबड्याचा सांधा अडकणे/दुखत रहाणे) होऊ शकतो. झेपेल तेवढा व्यायाम शांतपणे करावा आणि हळू हळू वाढवावा. सवय किंवा आवश्यकता म्हणून असलेला सततचा एकसुरी ‘स्क्रीन टाइम’ मान आणि खांदे यांच्या स्नायूसाठी त्रासदायक आहे, हे तर सर्वांना ठाऊक आहेच; पण सतत वापरत असलेले ‘इअर बड’ त्यात भर घालतात, हे घरातील पुढच्या पिढीला आवर्जून लक्षात आणून द्यायला हवे. (२८.३.२०२६)
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !