|

शिमला (हिमाचल प्रदेश) – येथे इस्लाम महंमद शाहिदुल नावाचा ३० वर्षीय तरुण किन्नर बनून मंदिरात येणार्या भाविकांकडून बळजोरीने पैसे घेत असल्याचा आरोप हिंदु रक्षा मंचने केला आहे. हिंदु रक्षा मंचने याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हा तरुण सामाजिक माध्यमांवर स्वतःची ओळख बांगलादेशी, अशी करून देत असल्याचेही मंचने म्हटले आहे.
१. याविषयी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक अन्वेषणानुसार शाहिदुल हा शिमल्यातील एपीजी विद्यापिठात पत्रकारितेचे शिक्षण घेतो. पोलिसांनी त्याच्या कागदपत्रांचीही पडताळणी केली आहे.
२. पोलीस अन्वेषणाच्या वेळी महंमद शाहिदुलने सांगितले की, तो तृतीयपंथी समुदायाशी संबंधित असून कालीमातेचा भक्त आहे. त्यामुळे तो कालीबाडी मंदिर, जाखू मंदिर आणि इतर धार्मिक स्थळी जातो.
३. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत त्याच्या विरुद्ध बळजोरीने पैसे वसूल केल्याची कोणतीही ठोस तक्रार आलेली नाही. (तक्रार येईपर्यंत पोलीस काहीच करणार नाहीत का ? – संपादक)
४. या प्रकरणाचे हिमाचल प्रदेशातील राजकारणातही पडसाद उमटले आहेत. हिमाचल प्रदेशाचे विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी ‘ही घटना गुप्तचर यंत्रणेचे अपयश असू शकते. जर आरोप खरे ठरले, तर ते सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह असेल’, असे सांगत त्यांनी हे सूत्र विधानसभेत मांडणार असल्याचे सांगितले.
शिमला मतदारसंघाचे आमदार हरीश जनारथा यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
संपादकीय भूमिकाएखादा मुसलमान हिंदूंच्या मंदिरात जाऊन हिंदु भाविकांवरच पैशांसाठी बळजोरी करेपर्यंत हिंदू काय करत होते ? हे हिंदूंना लज्जास्पद ! |
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी