आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे ३६ गुन्हे नोंद

कर्वेनगर (पुणे) – येथे १४ मार्चच्या रात्री चोराने ‘द टेरिटरी’ या ‘फोटो स्टुडिओ’ची खिडकी तोडून छायाचित्रक (कॅमेरा), महागड्या ‘लेन्स’, ड्रोन आणि आयफोन अशी एकूण ६ लाख ७१ सहस्र रुपयांच्या साहित्याची चोरी केली होती. या प्रकरणी ३८ वर्षीय व्यावसायिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही छायाचित्रक पडताळले असता संशयित व्यक्ती ‘रॉयल एनफिल्ड-हिमालयन’ बुलेटवरून जातांना दिसला.
तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपी पुणे येथून भाग्यनगर-चंद्रपूर-नागपूर-जबलपूर-मिर्झापूर मार्गे उत्तरप्रदेशात गेल्याचे निष्पन्न झाले. पुणे पोलिसांनी वाराणसी (उत्तरप्रदेश) पोलिसांच्या साहाय्याने आरोपीला अटक केली. अन्वेषणात आरोपीने स्वत:चे नाव नेवानाथ कुमार असल्याचे खोटे सांगितले. पडताळणीत आरोपीचे नाव महंमद नूर महंमद असल्याचे समजले. आरोपीकडून बांगलादेशी पारपत्र, अमेरिकी चलन (डॉलर), चिनी, मलेशियन, सिंगापूर, कॅनेडियन आणि नेपाळी चलन कह्यात घेण्यात आले. आरोपीच्या विरोधात आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांत ३६ गुन्हे नोंद आहेत. यांपैकी २९ गुन्ह्यांत त्याला यापूर्वी अटक केली होता, तर ६ गुन्ह्यांत पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (२ राज्यांत ३६ गुन्हे नोंद असूनही मोकाट फिरणार्या बांगलादेशी मुसलमानाला कठोर शिक्षा का केली नाही ? पहिल्याच गुन्ह्यात त्याच्यावर कठोर कारवाई झाली असती, तर पुढील गुन्हे झाले नसते. – संपादक)
आरोपीकडे परदेशी चलन आणि बांगलादेशी पारपत्र सापडल्यामुळे त्याचा एखाद्या आतंकवादी संघटनेशी संबंध आहे का ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. रामनगर (वाराणसी, उत्तरप्रदेश) पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय : हिंदू जात्यात !
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !