विवाहित पुरुषाचे ‘लिव्ह-इन’ संबंध वैध ठरवणे भारतीय कुटुंबव्यवस्थेवर आघात !
(‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ म्हणजे विवाह न करता स्त्री-पुरुष यांनी एकत्र रहाणे)

मुंबई – विवाहित पुरुषाचे ‘लिव्ह-इन’ संबंध हा गुन्हा नाही, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या निकालावर भाजपच्या नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला असून ‘हा निकाल केवळ कायद्याचे सूत्र नसून समाजाच्या नैतिकतेचा प्रश्न आहे’, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
कायदा आणि नैतिकता वेगवेगळी असू शकतात…
पण समाज या दोघांच्या समतोलावरच टिकतो.जेव्हा निर्णय नातेसंबंधांची पायाभरणीच कमकुवत करू लागतात, तेव्हा प्रश्न विचारणे गरजेचे ठरते.
महिलांचा सन्मान, कुटुंबाची स्थिरता आणि मुलांचे भविष्य हे दुर्लक्षित करून कोणतीही व्यवस्था मजबूत होऊ शकत नाही.… pic.twitter.com/KyqbETXgve
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 28, 2026
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की,
भारतीय संस्कृती आणि आपली कुटुंबव्यवस्था हीच आपल्या समाजाची खरी शक्ती आहे. जर या व्यवस्थेलाच अशा प्रकारे कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर त्याविरुद्ध ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. कायद्याच्या नावाखाली जर आपली प्राचीन कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होत असेल, तर त्याला ‘न्याय’ म्हणता येणार नाही, तो सरळ सरळ अन्याय आहे.
🚨 Strong Reaction to Allahabad HC Ruling 🚨
BJP MLA @ChitraKWagh calls the judgment a serious injustice that could weaken the Indian family system ⚖️
🔴 Key Concerns Raised:
🏠 Attack on Family Structure
Recognising a married man’s live-in relationship is seen as a blow to the… https://t.co/b8Oza2tw5a pic.twitter.com/36JZLlDQ5X— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 29, 2026
पत्नी आणि मुले यांच्या वेदनेला उत्तरदायी कोण ?
न्यायालयाने कायदा आणि नैतिकता या २ वेगळ्या गोष्टी असल्याचे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात नातेसंबंधांमध्ये कायदे हे समाजाची नैतिकता टिकवण्यासाठीच असतात. जेव्हा एखाद्या विवाहित पुरुषाच्या ‘लिव्ह-इन’ संबंधांना कायदेशीर मान्यता मिळते, तेव्हा त्याच्या पत्नीने सोसलेल्या वेदनांचे काय ? त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर होणार्या भयानक परिणामांची भरपाई कोण आणि कशी करणार ?
सविस्तर वृत्त वाचा →
क्लिक करा → ‘live-in’ Relationship : विवाहित पुरुषाने दुसर्या महिलेसमवेत ‘लिव्ह-इन’मध्ये रहाणे गुन्हा नाही ! |
महिलांचे शोषण आणि फसवणूक वाढणार !
सध्या ‘लिव्ह-इन’च्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक आणि शोषण होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. केवळ कायद्याच्या चौकटीत बसते; म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे समाजासाठी घातक आहे. या विषयावर समाजात व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे.

राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र