‘श्रीरामनवमी’च्या निमित्ताने ‘श्रीरामनामावली’ सदर !
लेखांक ३
भगवान श्रीविष्णूंच्या भूदेवी आणि श्रीदेवी या २ पत्नी आहेत. ज्या वेळी पृथ्वीवर दुराचार, पाप आणि अत्याचार यांचा अतिरेक होतो. भूदेवीला त्याचा त्रास असहनीय होतो, तेव्हा सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करून पत्नीचे दुःख दूर करण्याचे कर्तव्य भगवान तत्परतेने बजावतात. भगवंताचे दशाअवतार, म्हणजे श्रीरामतत्त्वाचेच अवतार आहेत.
लेखांक २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020732.html

‘राघव’ म्हणण्यामागील कार्यकारणभाव
समर्थ रामदासस्वामी यांच्या मते दशावतारातील सगळेच अवतार हे राघवाचीच विविध रूपे आहेत. सूर्यवंशातील हा रघु राजा प्रभु श्रीरामाच्या पुष्कळ आधी होऊन गेला आहे. चक्रवर्ती राजा दिलीप आणि महाराणी सुदक्षिणेला मिळालेला, दैवीय गोमाता कामधेनूच्या खडतर सेवाव्रताचा प्रसाद म्हणून पुत्रप्राप्ती झाली, तोच राजा रघु होय. संपूर्ण समुद्रवलयांकित पृथ्वीचे दिग्विजयी स्वामी, दानशूर, धर्मव्रती, प्रजाहितदक्ष राजा म्हणून कीर्ती प्राप्त झालेल्या या राजा रघुच्या नावावरून पुढे या वंशाला रघुवंश नाव पडले. त्या रघुराजाच्या पुढील पिढीतील सार्याच बालकांना ‘राघव’ संबोधले जाते. त्या अर्थाने दशरथ राजाचे चारही पुत्र ‘राघव’ आहेत. त्यातल्या त्यात ज्येष्ठपुत्र म्हणून श्रीरामाचा अधिकार मोठा आहे. श्रीसमर्थांचे आवडते नाव ‘राघव’ आहे. आपण जाणतोच की, श्रीसमर्थांचे आराध्य सद्गुरु श्रीरामतत्त्व आहे. ते म्हणतात,

‘राघवाचे रूप जाणावे अरूप । सिद्ध स्व-स्वरूप निराकार ।।’
त्या तत्त्वाचे नाव गुरु वसिष्ठ दशरथाच्या ज्येष्ठ पुत्राला देतात. त्या राघवाचे व्यावहारिक पातळीवरील रूप सगुण आहे. जो मानव रूपधारी राघव पतितांना पावन करतो, भक्तांचा उद्धार करतो, पराक्रम गाजवून दुष्टांना शासन करतो. त्याचे पारमार्थिक स्तरावरील रूप निर्गुण आहे, म्हणजे परब्रह्म आहे, याचा विसर श्रीसमर्थांना कधीच पडत नाही.
‘राघवाचे रूप ते माझे स्वरूप ।’आणि ते राघवाचे स्वरूप आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे; म्हणूनच रघुवंशातील श्रेष्ठ असा राघव वंदनीय आहे.
तेव्हा या नामावलीत श्रीराम चरित्राला आरंभ करण्यापूर्वी येथे श्रीसमर्थ म्हणतात, ‘रघुपतीराघव जय जय राम ।’
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
– श्रीमती स्नेहल पाशुपत, चिंचवड, पुणे.
(साभार : ‘श्रीरामनामावली’ पुस्तकातून)
लेखांक ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1021925.html
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?