
इस्लामाबाद (पाकिस्तान) – लाहोर शहरालगत असलेल्या मुरीदके येथे आतंकवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे उद्ध्वस्त झालेले मुख्यालय मरकज तैयबाच्या परिसरात २ जणांनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी याची गोळ्या झाडून आणि चाकूने वार करून हत्या केली.
⚠️ Terror Turns Inward: Commander Eliminated Amid Eid Gathering
LeT terrorist commander Bilal Arif Salafi was shot and stabbed to death by unknown gunmen inside Markaz Taiba, Muridke (Punjab).
The attack occurred moments after Eid prayers 🕌, when the complex was crowded with… pic.twitter.com/iMfCS7P7KQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 23, 2026
१. २२ मार्च या दिवशी दुपारी मरकज तैयबाच्या परिसरात ईदचे नमाजपठण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मौलाना अबू जार, मौलाना अब्दुल रहमान आबिद यांच्यासह लष्कर-ए-तैयबाचे अनेक मोठे कमांडर उपस्थित होते.
२. नमाज संपल्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी कमांडर बिलाल आरिफ सलाफी नमाजाच्या ठिकाणाहून बाहेर आला. त्या वेळी एका व्यक्तीने त्याच्यावर गोळी झाडली आणि एका महिलेने खंजिराने वार केले.
३. त्यानंतर लष्कर-ए-तोयबाचे उर्वरित आतंकवादी बाहेर आले आणि त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बिलाल आरिफ सलाफीला रुग्णालयात नेले.
४. सूत्रांनुसार लष्कर-ए-तैयबाचा आतंकवादी कमांडर बिलाल आरिफ सलाफी वर्ष २००५ पासून लष्कर-ए-तोयबाशी जोडलेला होता आणि सैन्यासाठी निधी गोळा करण्याचे काम करत होता.
५. सलाफी हा मुरीदके येथील तैयबा कॉलनीमध्ये त्याच्या कुटुंबासह रहात होते. तेथे सैन्याचे अन्य कमांडरही वास्तव्यास आहेत.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !