
तासगाव (जिल्हा सांगली) – येथील प्रसिद्ध १९२ वा रामोत्सव चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून (१९ मार्च) श्रीराममंदिर येथे प्रारंभ झाला. या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी सिद्धेश्वर रस्ता येथील श्रीराममंदिरापासून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध मार्गांवरून जाणार्या या शोभायात्रेत प्रभु श्रीरामचंद्रांच्या जयघोषात तासगावनगरी दुमदुमून निघाली. रामोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘श्रीरामदेव ट्रस्ट तासगाव’चे अध्यक्ष श्री. दिलीप जोगळेकर यांनी केले आहे.
या उत्सवात प्रतिदिन सकाळी ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता जनजागृतीपर प्रभातफेरी, सकाळी ७ वाजता श्रींची महापूजा, सकाळी ७.३० वाजता महाआरती, दुपारी १२.१५ वाजता महानैवेद्य, सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत विविध भजनी मंडळांकडून भजनसेवा, दुपारी ४.३० ते सायं. ५.३० या वेळेत प्रवचन, सायंकाळी ६ वाजता पुणे येथील ह.भ.प. संदीप बुवा मांडके यांची सुश्राव्य कीर्तने, रात्री ८.१५ वाजता करुणाष्टके, श्रीरामरक्षास्तोत्रपठण असे नित्य कार्यक्रम २५ मार्चपर्यंत होणार आहेत
२६ मार्च या दिवशी श्रीरामनवमीनिमित्त जन्मकाळाचे कीर्तन सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. दुपारी १२.३० वाजता श्रींचा जन्मकाळ होईल. २७ मार्च या दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी २ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. प्रज्वलबुवा गोसावी यांच्या लळीत आणि गोपाळकाला कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई