
बेंगळुरू (कर्नाटक) – सार्वजनिक ठिकाणी शांतता राखण्यासाठी आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकार विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमधील ‘डीजे’च्या (मोठ्या ध्वनीक्षेपक यंत्रणेच्या) वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याविषयी गंभीरपणे विचार करत आहे. कन्नड आणि संस्कृती मंत्री शिवराज टांगडगी यांनी विधानसभेत ही माहिती दिली. (केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येच नाही, तर इतर सर्वच सार्वजनिक ठिकाणी ‘डीजे’वर बंदी घालणे अपेक्षित आहे ! – संपादक)
कामगारमंत्री संतोष लाड यांनी हा विषय मांडला. ते म्हणाले, ‘सर्व सण-उत्सवांच्या वेळी ‘डीजे’ ही एक मोठी समस्या बनली आहे. कुठल्याही मिरवणुकीत ‘डीजे’विना आमचे देव पुढे सरकतच नाहीत, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.’ (काँग्रेसच्या मंत्र्यांना ‘डीजे’ विषयी नाही, तर हिंदूंच्या देवतांविषयी खरी समस्या आहे, हेच यातून दिसून येते ! – संपादक)
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ