|
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कारागृहांत बंदीवानांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यात अनेक बंदीवान अमली पदार्थांचे सेवन केल्याचे समोर आले आहे. यामध्ये विशेषतः महिला बंदीवानांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सध्या ज्या बंदीवानांनी अमली पदार्थांचे सेवन केले, असे समोर आले, त्यांना वेगळ्या कोठडीत ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ‘व्यसनाची पातळी नेमकी किती आहे ?’, हे जाणून घेण्यासाठी बंदीवानांच्या विविध घटकांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर व्यसनाच्या तीव्रतेनुसार पुढील उपचार केले जाणार आहेत.
Shocking state of Karnataka's prisons
A disturbing report reveals inmates are openly consuming drugs behind bars, with a high number of female prisoners involved.
The big questions:
– Are the prison authorities sleeping on the job or complicit?– If this is the state of highly… pic.twitter.com/MIZo9JJfID
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 20, 2026
विचाराधीन बंदीवानांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन अधिक प्रमाणात
लघवीच्या चाचणीमधून शिक्षा झालेल्या बंदीवानांपेक्षा विचाराधीन (खटले चालू न झालेले) बंदीवानांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याची संख्या अधिक असल्याचे उघड झाले. महिला कैद्यांनी चलाखी केल्याचेही समोर आले आहे. लघवीत पाणी मिसळून दिल्याचे प्रकार उघडकीस आले असून सध्या डॉक्टर अत्यंत सतर्कतेने नमुने घेऊन तपासणी करत आहेत.
अमली पदार्थांचे सेवन करणार्यांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. सध्या केवळ १० टक्के बंदीवानांची चाचणी झाली आहे. उर्वरितांचा चाचणी चालू आहे.
संपादकीय भूमिका
|

देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !