आरोग्य अधिकार्‍यांनी जनतेची दिशाभूल केल्याचे उघड !

हिंदु विधीज्ञ परिषदेने कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक मुतारी आणि स्वच्छतागृहे यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवल्याचे प्रकरण !

कोल्हापूर महापालिका

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील सार्वजनिक मुतारी आणि स्वच्छतागृहे यांच्या दुरवस्थेवर हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कोल्हापूर महापालिका आयुक्तांना १२ जानेवारी २०२६ मध्ये एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी या संदर्भात यात सुधारणा होणे आणि नागरिकांचे हित यांसाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी केली होती. या पत्राच्या संदर्भात ‘महापालिकेने काय केले ?’, याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली असता महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी नोव्हेंबर २०२५ आणि त्या अगोदरची कागदपत्रे देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

जानेवारी २०२६ मध्ये दिलेल्या पत्रावर जर नोव्हेंबर २०२५ आणि त्या पूर्वीची माहिती देण्यात येत असेल, तर महापालिकेच्या अधिकार्‍यांना जनतेच्या आरोग्यासाठी काही करण्याची इच्छा आहे कि नाही ? सार्वजनिक शौचालयांची स्थिती सुधारावी वाटते का ? जनतेच्या कररूपी पैशांतून वेतन घेणारे हे अधिकारी नेमके काय काम करतात ? असे प्रश्न उपस्थित होतात. तरी या संदर्भात शहरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद