युद्धकाळात लोकांना मिळत आहे मनःशांती

तेहरान – अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सध्या चालू आहे. या युद्धामुळे इराणमधील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इराणमधील एका मुसलमान तरुणीने फारसी भाषेत शिवभजन गायले आहे. या शिवभजनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. या भजनाने अनेकांच्या हृदयाला खोलवर स्पर्श केला आहे. भगवान शंकराला समर्पित असलेले हे भक्तीगीत गाऊन इराणच्या तरुणीने शांतता आणि एकता यांचा संदेश दिला आहे. या युद्धकाळात समोर आलेले हे भजन लोकांना मनःशांती देत आहे.
या व्हिडिओमध्ये इराणमधील मुसलमान तरुणी तिची मातृभाषा असलेल्या फारसी (पर्शियन) भाषेत भगवान शंकराचे भजन गातांना दिसत आहे. या भजनामध्ये ‘हर हर महादेव’ आणि ‘ओम नमः शिवाय’ यांसारख्या मंत्रांचा जप करण्यात आला आहे. तेथील श्रोत्यांसाठी हा एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि मनाला भिडणारा अनुभव आहे. या भजनाच्या माध्यमातून पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीत वाढलेले इराणी लोक भारतीय आध्यात्मिक शक्तीची एक झलक अनुभवत आहेत. या गाण्यात प्राचीन पर्शियन (इराण) आणि हिंदु संस्कृती यांच्यातील ऐतिहासिक संबंध दाखवले आहेत. संपूर्ण जग युद्ध आणि भू-राजकीय तणाव यांनी व्यापलेले असतांना या भजनाने लोकांपर्यंत आशा आणि शांतता यांचा संदेश पोचवला आहे. (अध्यात्मामध्ये जगातील सर्व समस्यांचे उत्तर दडलेले आहे, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक)
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी