
चिपळूण, १८ मार्च (वार्ता.) – येथील बाजारपेठेतील ‘हाशिम फॅशन’ आणि ‘इक्रझा’ या वस्त्र विक्री दुकानांत पाकिस्तान अन् तुर्की या देशांतील वस्त्रे ईदच्या निमित्ताने विक्रीसाठी उपलब्ध असल्याची रेहान रुमानी याने त्याच्या ‘इन्स्टाग्राम’वर जाहिरात (रिल) करून ती प्रसारित केली होती. याविषयी काही व्हिडिओ त्यांनी सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले. हे व्हिडिओ काही राष्ट्रप्रेमींच्याही पहाण्यात आले. त्यांनी ते व्हिडिओ पोलीसयंत्रणेच्या निदर्शनास आणून दिले आणि या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी लेखी तक्रारही श्री. सूरज कदम यांनी केली; परंतु तोपर्यंत सामाजिक माध्यमातून या पाकिस्तानच्या कपड्यांच्या विक्रीच्या विषय सर्वत्र पसरल्याने हिंदु जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी रिल करणार्याला कह्यात घेतले आहे. पोलिसांनी येथे कडक बंदोबस्त ठेवला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
१७ मार्चला काही हिंदुत्वनिष्ठांनी ‘हाशिम फॅशन’च्या दुकानात शकील इब्राहिम शेख आणि अदनान पारकर यांना ‘तुम्ही भारताच्या शत्रू राष्ट्र असलेल्या ‘पाकिस्तान’चे कपडे कशासाठी विकत आहात ?’, असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची आणि उद्धट भाषेत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि ‘तुम्हाला मारीन’, असे बोलल्याने यातून बाचाबाची झाली आणि एकाला चोप देण्यात आल्याचे समजते.
या ठिकाणी चिपळूण पोलीस अधिकार्यांनी धाव घेऊन अधिकची पोलीस कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलिसांनी राष्ट्रप्रेमी अमित जोशी, विक्रम जोशी आणि सूरज कदम यांची तक्रार प्र्रविष्ट (दाखल) करून घेतली, तसेच रेहान रुमानी, शकील इब्राहिम शेख आणि अदनान पारकर यांनीही तक्रार केली आहे.
हिंदूंचा गुढीपाडवा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असतांना, तसेच ‘पाकिस्तानसमवेत व्यापार प्रक्रिया स्थगित असतांना अशा प्रकारे राष्ट्रद्रोही कृती करणार्यांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे’, असे संतप्त प्रतिक्रिया सर्वत्रच व्यक्त केल्या जात आहेत.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका