हिंदु नववर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवरात्रीची आदिशक्ती देवी भगवतीच्या पूजेने चालू होण्यामागील कारण !

आध्यात्मिक दृष्टीकोनातून ‘काळ’ अनंत आणि अविभाज्य असला, तरी आपल्या हिंदु ऋषिमुनींनी सांसारिक आणि व्यावहारिक समतुल्य काळाची चार युगे (सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग), सहस्रयुग, शतक, दशक, वर्ष, मास, दिवस, घटी, पल आणि विपल अशा विविध एककांमध्ये विभाजन करून काळ मोजण्याची योग्य पद्धत स्थापित केली आहे. प्राच्य आणि ज्योतिषीय ग्रंथांमध्ये वर्णन आहे की, ब्रह्माने विश्वाची निर्मिती चैत्र शुक्ल प्रतिपदेला चालू केली आणि काळ मोजण्याची पद्धतही त्याच दिवसापासून चालू झाली. हिंदु नववर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवरात्रीची आदिशक्ती देवी भगवतीच्या पूजेने चालू होण्याचे हेच मुख्य कारण आहे.
आगामी हिंदु नववर्ष संवत २०८३ !

चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदु नववर्षाचा हा प्रारंभ अत्यंत शास्त्रीय, नैसर्गिक, वैज्ञानिक आणि स्वाभाविक आहे. या वेळी, सर्व निसर्ग आणि सजीव प्राणी हे नवीन चेतना, ऊर्जा आणि उत्साह यांनी भरलेले असतात. देशातील विविध राज्ये आणि हिंदु समुदाय यांमध्ये हा सण गुढीपाडवा (महाराष्ट्र/गुजरात), चेतीचंड (सिंधी समुदाय), युगादि (कर्नाटक), उगादि (आंध्रप्रदेश/तेलंगाणा), संवत्सर पाडवा (केरळम् आणि गोव्यातील कोकणी समुदाय), नवरेह (जम्मू आणि काश्मीर), सजिबू नोंगमा (मणिपूर), वैशाखी (पंजाब/हरियाणा), नववर्ष (बंगाल), ज्योतिष दिन इत्यादी म्हणून ओळखला जातो अन् साजराही केला जातो. आगामी हिंदु नववर्ष (संवत २०८३) चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच १९ मार्च २०२६ या दिवसापासून चालू होईल.
– आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा, सभापती, विश्व ज्योतिष महासंघ, बिहार.
अंकशास्त्राच्या दृष्टीकोनातून आगामी हिंदु नववर्षाचे फल !

अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनम् ।
सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ।। अर्थ : अर्धे शरीर असलेल्या, महापराक्रमी, चंद्र आणि सूर्य यांना ग्रासणार्या, सिंहिकेच्या गर्भातून उत्पन्न झालेल्या राहूला मी वंदन करतो.– आचार्य मिश्रा

राहू हा राजकारण, शंका, अचानक उदय आणि अस्त, फुटीरतावाद, अपूर्णता, अशांतता, उन्माद, अश्लीलता आणि कलंक यांचा कारक आहे. तो स्वभावाने शनीसारखा असतो. यावर्षी तो शनीच्या कुंभ आणि मकर या दोन राशींमध्ये बलवान होऊन गोचर करील. अशा परिस्थितीत देशासह जगात राजकीय अस्थिरता येण्याची शक्यता आहे. तेव्हा राजकारणाचे घृणास्पद आणि असभ्य स्वरूप दिसून येईल. राजकारण आणि राजकारणी कलंकित होतील अन् जनता त्यांच्याकडे संशयाने पाहील. जग, भारत आणि हिंदु समाज यांच्यामध्ये संशय, शत्रुत्व, फुटीरतावाद अन् वरील प्रवृत्ती प्रबळ रहातील. सामाजिक आणि राष्ट्रीय परिस्थितींमध्ये जलद चढउतार शक्य आहेत. भू-राजकीय परिस्थिती अनिश्चित आणि अस्थिर राहील. सनातनी हिंदु समाजावर फुटीरतावाद, अस्थिरता आणि परस्पर वैरभाव यांचा विपरीत परिणाम होईल. राष्ट्र्रवादी शक्ती, राष्ट्रप्रेमी-धर्मप्रेमी यांच्यात सुसंवादाचा अभाव दिसून येईल. यामुळे राष्ट्र आणि समाज एकसंध ठेवणे आव्हानात्मक ठरू शकते.
– आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा
आगामी हिंदु नववर्षातील ग्रहांची स्थिती !

१. नवीन संवतच्या (१९ मार्च २०२६ पासून) पहिल्या अडीच मासांपर्यंत ग्रहांचे गुरु बृहस्पती (गुरु) कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तिसर्या घरात शत्रू राशी मिथुनमध्ये रहातील. बृहस्पतीची ही स्थिती सांसारिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनातून मिश्र परिणाम दर्शवते. आर्थिक क्रियाकलापांमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. नवीन संवतच्या पुढील साडेनऊ मासांपर्यंत ग्रहांचा गुरु बृहस्पती कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये चौथ्या घरात कर्क राशीत राहील. परिणामी या काळात हिंदु समाज धार्मिकता, आध्यात्मिकता आणि सामाजिक सौहार्द या दिशेने वेगाने प्रगती करील. राष्ट्र, हिंदु समाज आणि कुटुंब यांमध्ये सुसंवाद अन् एकता यांची भावना प्रबळ होईल.
२. नवीन संवतमध्ये अनुमाने संपूर्ण वर्ष कर्माधिपती शनि कालपुरुषाच्या कुंडलीत बाराव्या घरात बृहस्पतीच्या मीन राशीमध्ये राहील. ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि राहू हे राजकारण, कूटनीती, तंत्रज्ञान अन् न्याय यांचे कारक समजले जातात. येत्या हिंदु नववर्षात शनीची स्थिती राष्ट्र आणि हिंदु समाज यांच्या राजकीय अन् तांत्रिक सक्षमीकरणाचे संकेत देते. हिंदु समाज, हिंदु संघटना आणि संत यांना न्याय किंवा न्यायालयीन सवलत मिळेल. त्यामुळे राष्ट्र आणि हिंदु समाज मानसिकदृष्ट्या बळकट होतील. आपले ज्ञान, आध्यात्मिकता आणि धार्मिक भावना अधिक तीव्रपणे जागृत करतील.
३. राहू अनुमाने पहिले ९ मास कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये ११ व्या घरात शनीच्या कुंभ राशीत असेल आणि शेवटचे ३ मास कालपुरुषाच्या कुंडलीच्या १० व्या घरात शनीच्या मकर राशीत असेल. केतू हाही वरील उल्लेखित समानकाळात क्रमश: कालपुरुषाच्या कुंडलीत ५ व्या घरात सूर्याच्या सिंह राशीत आणि चौथ्या घरात चंद्राच्या कर्क राशीत राहील. कुंभ आणि मकर या राशी कर्म अन् श्रम यांच्या अधिष्ठाता शनि ग्रहाच्या राशी आहेत. ज्योतिषशास्त्रात राहूला शनिसारखे समजले जाते.
४. राहूची स्थिती अत्यंत चढ-उतारांसह राजकारण आणि कूटनीती यांची पराकाष्ठा दाखवू शकते. संख्याशास्त्रावर आधारित नवीन संवत २०८३ च्या वर्षफलात सांगण्यात आले आहे, ‘राहूच्या या स्थितीमुळे नवीन आणि दीर्घकालीन कायदेशीर वाद निर्माण होतील. जुन्या वादांच्या निराकरणास विलंब होईल. राहू समाजात तथाकथित राजकीय आणि धार्मिक ढोंगीपणा यांना प्रोत्साहन देऊ शकतो. राजकीय-धार्मिक क्षेत्रात चढ-उताराची शक्यता आहे. केतू अविवेकी कृती करवू शकतो. भारतासह शेजारील देशांमध्ये अंतर्गत अशांतता निर्माण होऊ शकते.’
– आचार्य मिश्रा
‘कुंभ आणि मकर या राशी कर्म अन् श्रम यांच्या अधिष्ठाता शनि ग्रहाच्या राशी आहेत. ज्योतिषशास्त्रात राहूला शनिसारखे समजले जाते.’ – आचार्य मिश्रा
नूतन वर्षात हिंदूसंघटन वाढवणे काळाची आवश्यकता !

राष्ट्र, राज्य, संघटना, कुटुंब आणि इतर सामाजिक गट यांच्या नेत्यांनी त्यांचे गट एकसंध अन् ध्येयाभिमुख ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. बृहस्पती ग्रहामुळे निर्माण झालेल्या सकारात्मकतेचा लाभ उठवून आध्यात्मिक साधनेत व्यस्त राहून समाजाला अधिक धार्मिक, आध्यात्मिक आणि नैतिकदृष्ट्या अधिक बलवान अन् सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत अनुक्रमे आध्यात्मिक साधना हेच रक्षण अन् प्रगती यांचे मूलभूत साधन आहे.
मला आशा आहे की, ग्रहांचे मिश्र संकेत असूनही राष्ट्र आणि सर्व सनातनी हिंदू यांच्या जीवनात नवीन चेतना, नवीन ऊर्जा अन् नवीन उत्साह हिंदु नववर्ष निर्माण करील. भारत आणि हिंदु समाज हा धार्मिक, आध्यात्मिक अन् नैतिक दृष्ट्या अपेक्षेप्रमाणे अधिक बलशाली, तसेच सक्षम होईल. कालातीत परंपरेनुसार मानवतेला नवीन दिशा देतील.’
– आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा
राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्यावर प्रतिकूल परिणाम !
२५ एप्रिल २०२६ या दिवशी युद्धाचा कारक ग्रह आणि ग्रहांमध्ये ‘सेनापती’ म्हणून ओळखल्या जाणार्या मंगळाच्या उदयानंतर युद्धोन्माद अन् अशांतता वाढण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून इतर ग्रह सूर्य, बुध आणि शुक्र यांची स्थिती राष्ट्र अन् हिंदु समाज यांसाठी कधी सकारात्मक, तर कधी नकारात्मक राहील. अर्थात् सरासरी परिणाम फलदायक असतील.
अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून थोडक्यात सांगता येते की, नवीन हिंदु वर्ष संवत २०८३ मध्ये संपूर्ण जग, राष्ट्र आणि हिंदु समाज यांच्यात संशय, वैर, फुटीरतावाद यांसारख्या प्रवृत्ती प्रबळ रहातील. सामाजिक आणि राष्ट्रीय परिस्थितीत जलद चढ-उतार होण्याची शक्यता आहे. भू-राजकीय परिस्थिती संशयास्पद आणि अस्थिर राहील. सनातन हिंदु समाजावर फुटीरतावाद, अस्थिरता आणि अंतर्गत वैर यांचा प्रतिकूल प्रभाव निर्माण होईल. राष्ट्रवादी शक्ती, राष्ट्र आणि धर्मप्रेमी यांच्यात एकतेचा अभाव दिसून येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्र आणि समाज यांना एकसंध ठेवणे आव्हानात्मक असू शकते.
जयतु ! मंगलम् भवतु ! शुभमस्तु !
– आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा, सभापती, विश्व ज्योतिष महासंघ, बिहार.
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !