
बेळगाव (कर्नाटक) – इराणचे सर्वाेच्च नेते खामेनी यांच्या समर्थनार्थ बेळगाव शहरात फलक लावल्याच्या निषेधार्थ श्रीराम सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या अशोक सर्कल आणि कोल्हापूर सर्कल येथे कार्यकर्त्यांनी खामेनी समर्थकांचा निषेध केला. या वेळी खामेनी यांच्या फलकाला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे असलेले फलक लावण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचे चित्र दाखवून हिंदूंनी रोष व्यक्त केला.
🚩After Khamenei banner surfaced, Shriram Sena protests with posters of PM Modi, Netanyahu, and Chhatrapati Shivaji Maharaj across the city.
Is Belagavi in India or Pakistan? With the current Congress govt in Karnataka, it feels like a "second Pakistan" is being fostered.… pic.twitter.com/7BoMLKoLvR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 18, 2026
बेळगाव शहरात कुठलेली फलक लावू नये, अशी विनंती बेळगाव शहर पोलिसांनी केली होती; मात्र पोलिसांची विनंती झिडकारत खामेनी समर्थकांनी शहरात खामेनींचे छायाचित्र असलेले फलक लावले होते. याला प्रत्युत्तर म्हणून श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी इस्रायल आणि भारत यांच्या पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला. या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘जय श्रीराम’ यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
संपादकीय भूमिकाखामेनी यांचे फलक झळकायला बेळगाव भारतात आहे कि पाकिस्तानात ? अर्थात् काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात दुसरे पाकिस्तानच वसलेले असल्याने अशा गोष्टी घडत असतील, तर त्यात आश्चर्य नाही ! |
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !