
‘मला पोट एकदाच साफ होते, तरीही मला खालच्या भागात सूज येते आणि त्या जागी टोचल्यासारखे दुखते…’, अशा प्रकारची तक्रार घेऊन रुग्ण आमच्याकडे येतो, तेव्हा नवीन जगाची नवीन कारणे विचारात घ्यायला लागतात.

‘कमोड’मध्ये असणारा ‘जेट स्प्रे’ हा मोठ्या प्रमाणात मूळव्याध आणि ‘फिशर’ (गुदद्वाराच्या जागी त्वचेला पडलेली चीर) याला वाढवण्यास नवीन कारण बनत आहे. ९ ते १० घंटे एका जागी सतत बसून रहाणे किंवा ‘बाईक्स’ (दुचाकी)वरून लांब फिरायला जाणे, मैद्याचे पदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव, भाज्या आणि फळे यांचा आहारात अजिबातच समाविष्ट नसणे, वातानुकूलित (एसी) खोलीमध्ये असल्याने पाणी पिण्याची कमतरता अशा एक किंवा अनेक कारणांनी आधीच नाजूक झालेल्या गुद भागाला ‘जेट स्प्रे’ किंवा ‘हेल्थ फॉसेट’चा मार बसला, तर मूळव्याध, ‘फिशर’ आणि संलग्न तक्रारी चालू होतात. प्रत्येक वेळी पोट साफ न होणे किंवा मलाचा खडा हीच कारणे असतील, असे नाही.
लहान बाळांविषयीही ‘टीशू पेपर’ने (हात किंवा चेहरा पुसण्यासाठी मऊ, पातळ आणि हलका कागद) घासून न पुसता सुती कापडासह हलक्या हाताने ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. सगळा भाग घासत बसू नये. कुठलेही गंध नसलेले साधे ‘वेट वाईप्स’ (ओले पुसणे) अगदीच सोयीसाठी प्रवासात वापरावे. नंतर तूप लावावे.
जोरात पाणी येणार्या ‘डायरेक्ट स्प्रे’चा (पाण्याच्या थेट फवार्याचा) वापर न करता पाण्याने हलक्या हाताने / ओल्या पेपरने ती जागा साफ करावी. त्यानंतर तूप लावावे. मोठ्या प्रमाणात रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू असल्याने तिथे दुखणी पटकन होतात अन् आपल्या पचनसंस्थेचा शेवटचा संवेदनशील भाग असल्याने ते अधिक जाणवतेसुद्धा, म्हणून ही विशेष काळजी !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !