फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी व्यक्त केली आशा

हेलसिंकी (फिनलँड) – पश्चिम आशियातील चालू असलेले युद्ध थांबवण्यासाठी जगाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याची अपेक्षा फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी व्यक्त केली. या वेळी ते म्हणाले की, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम घडवून आणण्यासाठी युरोप अन् विशेषतः भारताने अधिक सक्रीय भूमिका घ्यावी. अलीकडील काळात परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी इराणी नेत्यांशी चर्चा केली असल्याचे नमूद करत, ‘भारताने खरोखर पुढाकार घेतल्यास ते अत्यंत उपयुक्त ठरेल. भारतावर दोन्ही बाजूंचा विश्वास असल्यामुळे हे शक्य आहे, असे मला वाटते’, असेही ते म्हणाले.
स्टब यांनी याच महिन्यात ४ ते ७ मार्च या कालावधीत भारताचा दौरा केला होता. अलीकडे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी परिस्थिती शांत करण्यासाठी युद्धबंदीचे आवाहन केले.
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !