
मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या प्रकरणावरून चर्चा घडवून आणावी, या मागणीसाठी विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले. या विषयावर सभागृहात तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. यापूर्वी सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी याविषयी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अधिवेशन चालू होऊन बरेच दिवस उलटले, तरी अद्याप यावर चर्चा झालेली नाही, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. प्रारंभी सदस्य अमोल मिटकरी यांनी हा विषय मांडला. या मागणीला सदस्य शशिकांत शिंदे, सचिन अहिर आणि भाई जगताप यांनी जोरदार समर्थन दिले. यावर सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, अल्प सूचनेच्या आधारे हा विषय सभागृहात चर्चेला घेतला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ मार्च या दिवशी दौर्यावर असल्याने ते परतल्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा ठेवली जाईल.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)