मुरादाबाद येथे दंत महाविद्यालयात शिकणारा आतंकवादी हारिश अली याला अटक !

‘इस्लामिक स्टेट’साठी आतंकवादी सिद्ध केल्याचा आरोप

आतंकवादी हारिश अली

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – दंत महाविद्यालयाचा विद्यार्थी हारिश अली याला आतंकवादविरोधी पथकाने नुकतीच अटक केली. ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेसाठी आतंकवादी सिद्ध केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याने ‘अल इत्तिहाद’ नावाने सामाजिक माध्यमावर खाते उघडून त्याद्वारे उत्तरप्रदेशातील शेकडो युवकांचा बुद्धीभेद केला आणि त्यांना आत्मघाती आक्रमणासाठी प्रवृत्त केले. हारिश याच्याकडून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. भारतात शरीयत कायदा आणि खलिफा शासन (इस्लामनुसार चालणारी शासनव्यवस्था) प्रस्थापित करण्याविषयी तो चर्चा करत असे.

१. पोलीस अन्वेषणात उघड झाले की, १९ वर्षीय हारिश अली हा मूळचा सहारनपूरमधील मानक मऊ परिसरातील रहिवासी आहे. तो मुरादाबादमधील एका नामांकित दंत महाविद्यालयात शिकत होता.

२. मुसलमान युवकांना ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेशी जोडण्यासाठी हारिश अलीने ‘अल इत्तिहाद’ नावाचे सामाजिक माध्यमावर खाते उघडले होते.

३. सामाजिक माध्यमांचा वापर करून तो मुसलमान युवकांना ‘इस्लामिक स्टेट’च्या प्रचारासाठी वापरल्या जाणार्‍या ‘दाबिक’ आणि ‘अल-नबा’ यांसारख्या माध्यम सामग्रीचा प्रसार करत असे.

४. आतंकवादाविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार हारिश अली गेल्या २ वर्षांत अनेकदा जम्मू-कश्मीरलाही गेला होता. मुरादाबादसह संभल, अमरोहा आणि बिजनौर या पश्चिम उत्तरप्रदेशातील अनेक जिल्ह्यांत त्याने त्याचे जाळे पसरवले होते.

संपादकीय भूमिका

उच्च शिक्षित मुसलमानही आतंकवादाकडे वळतात, ही ‘मुसलमान गरिबीमुळे आतंकवादाकडे वळतात’, असे म्हणणार्‍यांना चपराक !