
आला गुढीपाडवा ।
हिंदु राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवू चला ।।
हिंदु राष्ट्राचा ध्वज भगवा ।
हाती घेऊ चला आता ।। १ ।।

भगवा ध्वज ‘त्याग अन् बलीदान’ यांचे प्रतीक ।
भगवा ध्वज आमच्या अस्मितेचे प्रतीक ।।
ठेवण्या त्याचा मान ।
चला गगनी फडकवू आता ।। २ ।।
भगवा ध्वज गगनी फडकला ।
डौलाने डोलू लागला ।।
हलकेच मग माझे कानी कुजबुजला ।
‘ऊठ लवकर, पहाट पहा हिंदु राष्ट्राची’ ।। ३ ।।
सण हा आनंदाचा ।
अमाप उत्साह ओसंडून वहाण्याचा ।।
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ची ।
मनापासून देऊ आरोळी ।। ४ ।।
– श्री. संजय घाटगे (वय ६२ वर्षे), जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर (२६.३.२०२५)
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
मुसलमानांनी पूर्वजांच्या परंपरा स्वीकारल्यास त्यांना हिंदु राष्ट्रात कोणताही धोका नसेल ! – Yogrishi Ramdev baba
पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !