उत्तरदायींवर होणार कारवाई

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेत विचारण्यात आलेल्या एका बहुपर्यायी प्रश्नामुळे वाद निर्माण झाला. प्रश्न होता, ‘परिस्थितीनुसार पालटणारा कोण ?’ यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय ‘पंडित’ असा होता. भाजपचे प्रदेशमंत्री अभिजात मिश्रा यांनी यावर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीचे माध्यम प्रमुख प्रशांत पांडेय यांनी ‘पंडित’ शब्दाचा पर्याय दिल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. हिंदु महासभेने ब्राह्मण समाजाचा अपमान झाल्याचा आरोप करत गुन्हा नोंदवण्याची घोषणा केली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी ‘उत्तरदायींवर कारवाई होईल’, असे सांगितले. सरकारने या प्रकरणाची गंभीर नोंद घेत भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये; म्हणून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत.
Controversy in UP Police Recruitment! 🚨
A question in the UP Police SI exam asking "Who changes with the situation?" with "Pandit" as an option has sparked outrage.
Key Updates:
Govt Action: Deputy CM @brajeshpathakji assured action against those responsible.Strict Orders:… pic.twitter.com/poC49QX0Gu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 16, 2026
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व भरती मंडळांच्या अध्यक्षांना निर्देश दिले की, प्रश्नपत्रिका बनवतांना कोणत्याही व्यक्ती, जात, पंथ किंवा समुदाय यांच्या श्रद्धा आणि सन्मान यांच्याशी संबंधित विषयांवर अवमानकारक टिपणी कोणत्याही परिस्थितीत समाविष्ट करू नये. प्रश्नपत्रिका बनवणार्यांना यासंदर्भात स्पष्ट सूचना देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून संवेदनशीलता राखली जाईल.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !