महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांना अनावृत्त पत्र
‘समाजातील महिलांना राज्यघटनेची जाणीव व्हायला हवी. आपण महिलांना पोथ्या-पुराणांमध्ये अडकवले आहे; पण राज्यघटना वाचणे आपल्याकडून राहिले. मुलीला सासरी पाठवतांना तिच्या हातात राज्यघटना द्या’, असे विधान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी केले. याच अनुषंगाने काही सूत्रे मी येथे देत आहे.

१. सौ. रूपाली चाकणकर यांनी एक लक्षात घ्यावे की, एकतर हिंदु समाजाने कधीही पोथ्या-पुराणे आपल्या मुलींना दिली नाहीत, हे दुर्दैव आहे. जर दिली असती, तर आजपर्यंत कित्येक महात्मे अजून जन्माला आले असते. तसा विचार केला, तर देशाच्या स्वातंत्र्यापासून फार कमी लोक असे जन्माला आले की, ज्यांची नोंद ‘संत’ म्हणून करावी.

२. धर्मप्रेमाविषयी जगातील सर्वांत उदासीन कोण असेल, तर तो हिंदु आहे. कुणाला धर्माविषयी प्रेम, अभिमान नाहीच. उदाहरण सांगायचे झाले, तर आपण सौ. रूपाली चाकणकर यांच्याकडेच बघू शकतो. त्यांना धर्माने संस्कार दिले, आदर दिला, त्या एका मोठ्या पदावर विराजमान आहेत आणि तरीसुद्धा ते आपल्या (हिंदु) धर्माविरोधात बोलायचे धाडस करत आहेत. जर तेच त्या जन्माने मुसलमान असत्या आणि कुराणविषयी त्या अशा प्रकारे बोलल्या असत्या तर ?
३. राज्यघटना हे काही जादुई पुस्तक नाही. त्यातसुद्धा रामायण, महाभारत यांच्याविषयीची चित्रे दिली होती. काही काळापूर्वी काँग्रेसने ती काढली. याचाच अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याविषयी आदर होता.
४. हिंदु धर्माचे संस्कार आणि सहिष्णुता यांचा विचार केला, तर महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही उघड उघड हिंदुत्व अन् हिंदूंच्या रूढी परंपरा यांना नावे ठेवणार्यांना सरकारमध्ये सहभागी करून घेतले आहे.
५. समोरचा व्यक्ती जर हातात शरीयत आणि कुराण घेऊन आला असेल, तर तुम्ही त्याच्या हातात राज्यघटना देण्याचे धाडस ठेवता का ? किंवा अशाच एखाद्या मुसलमानाला (त्यांच्या लग्नात सोडून द्या) ‘कुराणच्या आधी राज्यघटना हातात घे’ किंवा ‘तुझ्या आई-वडिलांनी राज्यघटना का दिली नाही ?’, असे म्हणून विचारू शकता का ? किंवा सल्ला देऊ शकता का ?
मुसलमानांच्या दृष्टीने हिंदू सर्व दृष्टीने काफीरच !
अर्थातच असे बोलण्याचे धाडस तुमच्यात नाही; कारण तुम्हाला परिणामांची जाणीव आहे. त्यामुळे असे बोलायचे धारिष्ट्य तुम्ही केवळ न केवळ हिंदूंच्या पोथ्या-पुराणांविषयी केले. साहजिकच तुम्ही हे विरोधी विचारांच्या समाजाला खूश करण्यासाठी केले आहे, यात तुम्हालासुद्धा शंका नसेल; पण तुम्ही एक सूत्र विसरला आहात की, ‘तो’ समाज जेव्हा त्यांना त्यांचा नेता मिळेल, तेव्हा तुम्हालासुद्धा ‘कैसा हराया…!’ (कसे हरवले), असे करणार आहे.
| हे वाचा → (म्हणे) ‘महिलांना पोथ्या-पुराणांमध्ये अडकवले आहे !’ – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर |
मुसलमानांच्या कुप्रथांविषयी बोलण्याचे धाडस करणार का ?
हिंदु हा सहिष्णू आहे. अगदी उकिरडा लाजेल इतका सहिष्णू आहे; पण आता काही राजकारणी लोक त्याचा चुकीचा अर्थ काढू लागले आहेत आणि बहुधा हिंदूंना ‘pushing to the corner’ (कोपर्यात ढकलणे) असे करून संयम पडताळत आहेत. असे असले, तरी मला सौ. रूपाली चाकणकर यांच्या पक्ष प्रमुखांवर विश्वास आहे. त्या नक्कीच केवळ ‘हिंदु’ महिलांच्या लग्नाविषयी पद्धत शिकवणार्या सौ. रूपाली यांना ‘लव्ह जिहाद’, ‘हलाला’ (मुसलमान महिलेला तलाक दिल्यानंतर तिला पुन्हा त्याच व्यक्तीशी विवाह करायचा असेल, तर त्यापूर्वी तिला दुसर्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवावा लागतो), अशा अनेक दुर्दैवी आणि जुलमी रूढींविषयी बोलायचा सल्ला देतील किंवा त्यांचे त्यागपत्र घेतील.
– अनंत करमुसे, धर्मप्रेमी, ठाणे.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !