|

मुंबई – समाजातील महिलांना राज्यघटनेची जाणीव व्हायला हवी. आपण महिलांना पोथ्या-पुराणांमध्ये अडकवले आहे; पण राज्यघटना वाचणे आपल्याकडून राहिले. मुलीला सासरी पाठवतांना तिच्या हातात राज्यघटना द्या, असे विधान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले आहे.
🚨 “Women have been trapped in scriptures and Puranas!” – says Rupali Chakankar
The Chairperson of the Maharashtra State Commission for Women claimed that women have been confined to scriptures and Puranas and said daughters should be given the Constitution when they go to… pic.twitter.com/znTZ4OLjdK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 7, 2026
आयोगाच्या वतीने ‘जागतिक महिला दिना’निमित्त मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. (आज धर्मशिक्षणाच्या अभावापायी मुळातच हिंदु समाज, त्यातही युवा पिढी हिंदु धर्मापासून दूर जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विधान हिंदुविरोधी कथानकाला खतपाणी घालण्याचाच प्रकार आहे. यावरून ‘रूपाली चाकणकर या ‘डीप स्टेट’च्या हस्तक आहेत कि काय’, असा प्रश्न कुणी उपस्थित केला, तर चुकले कुठे ? – संपादक)
(डीप स्टेट म्हणजे सरकारी अधिकारी, सैन्याधिकारी, खासगी संस्था, अब्जाधीश उद्योगपती यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेद्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात अथवा त्यांना अनुकूल असे वातावरण देशात तयार केले जाते.)
संपादकीय भूमिका
|
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !