मुंबई मराठी पत्रकार संघात ‘एआय परिषद’ !

मुंबई – पत्रकारितेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा, म्हणजे ‘एआय’चा वापर झपाट्याने वाढत असला, तरी त्याला वास्तव समजण्याची क्षमता नसते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सत्य शोधण्याचे दायित्व आणि समाजाचा विश्वास संपादन करणे, हे पत्रकारितेचे मूलभूत बळ आहे. त्यामुळे पालटत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. पत्रकारांनी ‘एआय’कडे धोका म्हणून न पहाता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे. यासाठी पत्रकारांना ‘एआय’चे प्रशिक्षण देण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकारातून लवकरच ‘एआय इन जर्नालिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू करण्याचा विचार आहे. असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’चे उद्घाटन महासंचालक श्री. सिंह यांच्या हस्ते झाले.
ते पुढे म्हणाले,
१. भविष्यातही अनेक कामे स्वयंचलित होणार असली, तरी पत्रकारितेमधून सत्यता मांडण्याचे दायित्व मात्र मानवी बुद्धीवरच अवलंबून रहाणार आहे.
२. भारतीय भाषांचे आकलन ही ‘एआय’ची एक मोठी मर्यादा आहे. एआय तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असली, तरी त्याला मराठीसह भारतीय भाषांचा संदर्भ पूर्णपणे समजत नाही. त्यामुळे भारतीय भाषांसाठी स्वतंत्र ‘एआय’ विकास आणि ‘डेटा सार्वभौमत्व’ महत्त्वाचे आहे.
France 24 Media : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवून मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे !’
प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांच्याकडून हिंदु धर्मग्रंथ, देवता, प्रतिके यांचे ‘फ्रॉईडीय मनोविश्लेषणा’च्या घातक पद्धतीतून श्रद्धाहनन !
संपादकीय : कृत्रिम बुद्धीमत्तेची मर्यादा !
कायदेशीर प्रकरणांत एआयचा वापर मानव देखरेखीखालीच हवा ! – Supreme Court
Ford Rehired Engineer : ‘एआय’च्या मर्यादा लक्षात येताच ‘फोर्ड’ आस्थापनाने शेकडो अभियंत्यांना पुन्हा कामावर घेतले !
Indus Water Treaty Crisis : सिंधू जल वाटप करारावरून पाकने काश्मीरमधील सीमेवर तैनात केले ३५ ड्रोनविरोधी युनिट !